Join us

शेतकऱ्यांनो सावधान! 'बर्ड फ्लू'ची राज्यात एंट्री; कुक्कुटपालनासाठी धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 7:50 PM

शेतकऱ्यांसाठी हा मोठा धोका निर्माण झाला आहे.

नागपूर : कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा अडचण निर्माण झाली असून बर्ड फ्ल्यू या रोगाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. नागपुरामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं असून अनेक नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये जवळपास ८ हजार पक्षी बर्ड फ्ल्यू या रोगाने बाधित झाले होते.

दरम्यान, प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये बाधित झालेले सर्व पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. ही साथ केवळ प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागातील खासगी पाेल्ट्री फार्ममध्ये मात्र ही साथ नाही. तरीही शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत  आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या कोंबड्यांना या रोगाची बाधा झाली आहे अशा शेतकऱ्यांनी शेतकरी आणि इतर नागरिकांच्या दृष्टीकोनातून कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. जेणेकरून बर्ड फ्ल्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी