Join us

Ranikhet Disease कोंबड्यातील 'मानमोडी' आजाराचे वेळीच करा नियंत्रण

By रविंद्र जाधव | Published: July 02, 2024 8:00 PM

कोंबड्यांच्या विविध आजारांपैकीच एक म्हणजे कोंबड्यांना होणारा मानमोडी (Ranikhet Disease) हा संसर्गजन्य आजार होय. यात पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. मात्र हे नुकसान टाळले जाऊ शकते. ज्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे.  

शेतकरी परसबागेत किंवा जोधधंदा म्हणून कोंबडी पालन अर्थात कुक्कुटपालन करतात. व्यवस्थापन मुख्य असलेल्या कोंबडी पालनात विविध आजरांची (Poultry Diseases) साथ अधिक असते. आकाराने लहान पक्षी असल्याने लवकर उपचार न झाल्यास मोठी आर्थि हानी होते. 

कोंबड्यांच्या विविध आजारांपैकीच एक म्हणजे कोंबड्यांना होणारा मानमोडी (Ranikhet Disease) हा संसर्गजन्य आजार होय. यात पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. मात्र हे नुकसान टाळले जाऊ शकते. ज्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे.  

यासाठी मानमोडी या रोगाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या.

मानमोडी आजाराची कारणे 

मानमोडी हा रोग पॅरामिक्सो विषाणूंमुळे होतो. हे विषाणू पक्ष्यांचे श्वसनेंद्रिय, पचनसंस्था, मज्जासंस्था व यकृत यांसारख्या अवयवांवर परिणाम करतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे, आजारी पक्ष्यांच्या विष्ठेद्वारा व श्वसना द्वारे होतो. आजारी पक्ष्यांमुळे पक्षी घरातील वातावरण, उपकरणे व काम करणाऱ्यांच्या कपड्यांवर हे विषाणू मोठ्या प्रमाणात जमा होतात. हे विषाणू वातावरणात बराच वेळ टिकून राहतात.

दूषित खाद्य व पाणी, मेलेले पक्षी उघड्यावर टाकणे, लिटर, अंडी उबवणूक यंत्र, इ. पासून या रोगाचा प्रसार होतो. इतर जातींच्या पक्ष्यांना सुद्धा हा रोग होतो व हे पक्षी रोगप्रसारास कारणीभूत ठरतात.

मानमोडी आजाराची लक्षणे (Ranikhet Disease In Poultry Symptoms)

या रोगाची लक्षणे, मृत्यूचे प्रमाण, तीव्रता ही विषाणूंचा प्रकार, पक्ष्यांचे वय, लसीकरण, रोगप्रतिकारक शक्ती, साथ, वातावरण व व्यवस्थापन यावर अवलंबून असतात.

• मोठ्या पक्ष्यांमध्ये अधिकाधिक पक्षी एका रात्रीत आजारी पडतात.• पक्ष्यांना पाण्यासारखी हिरवट रंगाची संडास होते, पंख व पाय अधू होतात. मान वाकडी होते.• अंडी देण्याचे प्रमाण घटते. कवच मऊ होते व अंड्याचा आकार बदलतो तसेच पांढरा बलक पाण्यासारखा पातळ होतो.• श्वास घेताना मोठा आवाज होतो. तोंडाने श्वासोच्छवास करतात.• लहान पिलांमध्ये हा तीव्र स्वरुपाचा आजार असून श्वसनाची व मज्जासंस्थेची लक्षणे दिसून येतात, पिल्ले व तलंग सुस्त व अशक्त दिसतात.• पक्ष्यांना चालता येत नाही, थरथर कापतात व लंगडतात. डोळा आणि गळ्याला सुज येते.

उपचार (Ranikhet Disease Treatment)

या रोगावर परिणामकारक उपचार उपलब्ध नाहीत; परंतु या रोगानंतर होणाऱ्या जिवाणूजन्य रोगांवर उपचार म्हणून प्रतिजैविकांचा वापर करण्यात येतो.

• आजारी पक्षी वेगळे काढावे. मृत पक्ष्यांना जाळून टाकावे.• दूषित पाणी व खाद्य नष्ट करावे.• ऑल इन ऑल आऊट व्यवस्थापन पद्धत राबवावी.• शेडचे फ्युमीगेशन करावे. ज्यासाठी ३० मि.लि. फॉर्मेलीन व २० ग्रॅम पोटॅशिअम परमँगनेटचा वापर करावा.

लसीकरण (Ranikhet Disease Vaccine)

• पिल्ले आणल्यानंतर सहाव्या दिवशी लासोटा लस (Lasota Vaccine) डोळ्यांतून एक थेंब द्यावी व त्यानंतर बूस्टर डोस सहाव्या आठवड्यात पाण्यातून देऊन लसीकरण करावे.• अंडी देणाऱ्या पक्ष्यांमध्ये दर सहा आठवड्यांनी पाण्यातून लसीकरण करावे.• लस सहाव्या आठवड्यात व बूस्टर डोस १५ व्या आठवड्यात इंजेक्शनद्वारे पंखाखाली द्यावी.• पक्ष्यांना लसीकरणापूर्वी दोन ते तीन दिवस आधी पाण्यातून जंतनाशक औषध द्यावे.

वरील लक्षणे दिसतात प्रतिबंधक उपाय करत या आजरांवर मात करता येते.

डॉ. श्रीकांत मोहन खुपसेसहायक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - कुक्कुटपालन करायचे ? मग या कोंबडीला निवडा होईल दुप्पट नफा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीबर्ड फ्लूशेतकरी