मका हे आंतराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाते. प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांचा समावेश होतो.भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२२-२३ मध्ये, जगात मागील वर्षांच्या तुलनेत ६ टक्के मक्याचे उत्पादन कमी होण्याच्या अंदाज आहे.अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मका निर्यात २०२१-२२ मध्ये ३४ लाख टन झाली होती त्यामध्ये चालू वर्षी २०२२-२३ मध्ये ६ लाख टनांची वाढ होऊन ती ४० लाख टन होईल असा अंदाज आहे.
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार देशात सन २०२३-२४मध्ये मक्याच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे. मात्र देशात चालू वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के इतकी जास्त झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात खरीप २०२३-२४ मध्ये मक्याच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ साठी मका पिकाची आधारभूत किंमत (MSP) रु. २०९० प्रति क्विं. इतकी आहे.
मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या एप्रिल ते जून महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे२०२१ - रुपये १७५१ प्रति किंटल २०२२ - रुपये २१५२ प्रति किंटल २०२३ - रुपये १८५३ प्रति क्विंटल
मक्याचे बाजारभाव कसे असतीलएप्रिल ते जून २०२४ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किमत अंदाज पुढील प्रमाणे रुपये २००० ते २४०० प्रति क्विंटल असे राहण्याची शक्यता आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार माहिती व जोखीम व्यवस्थापन विभाग, पुणे यांनी हा अंदाज वर्तविला आहे. सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमतीविषयक अनुमान दर्शिवितो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि सरकारी धोरण यामध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्कबाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणेमा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पएम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस.बी.मार्ग, सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६फोनः ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०