Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > सर्जा-राजा'ची कुंडली ठेवा आता मोबाइलवर!

सर्जा-राजा'ची कुंडली ठेवा आता मोबाइलवर!

Put Sarja-Raja's horoscope on mobile now! | सर्जा-राजा'ची कुंडली ठेवा आता मोबाइलवर!

सर्जा-राजा'ची कुंडली ठेवा आता मोबाइलवर!

पशुपालकांसाठी ई-गोपाला ॲपपर जनावरांच्या खरेदी- विक्रीची माहिती एक क्लिकवर मिळणार...

पशुपालकांसाठी ई-गोपाला ॲपपर जनावरांच्या खरेदी- विक्रीची माहिती एक क्लिकवर मिळणार...

शेअर :

Join us
Join usNext

पशुपालकांसाठी ई-गोपाला ॲप तयार करण्यात आले असून त्यामाध्यमातून जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांची उपलब्धता, लसीकरणाचे अलर्ट, जनावरांच्या खरेदी- विक्रीची माहिती एक क्लिकवर मिळणार आहे. विशेष म्हणजे, या ॲपवर पशुपालकांना जनावरांचे टॅगिंगही करता येणार आहे.

काय आहे ई- गोपाला ॲप?

केंद्र सरकारने पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ई-गोपाला अॅप काढले आहे. या अॅपद्वारे पशुपालकांना लसीकरणाचे अलर्ट, प्रजनन सेवांची उपलब्धता यासह उपचार अशा अनेक गोष्टींची माहिती एका क्लीकवर मिळणार आहे.

जनावरांचे आधार कार्ड

जनावरांचा टॅगिग क्रमांक म्हणजेच त्याचे ते आधार कार्ड असणार आहे. जनावरांच्या कानात पिवळा टॅग बसविला जातो. त्या टॅगवर १२ आकड्याचा क्रमांक असतो.

टॅगिंगचा क्रमांक देताना जनावराच्या मालकाचे नाव, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, गाव, संबंधित जनावराचे किती वेत झाली, त्या जनावरला केलेले लसीकरण, वैद्यकीय उपचार, खरेदी-विक्री आदी अनेक महत्त्वाच्या नोंदी केल्या जातात. त्यामुळेच टॅगिंग क्रमांकाला आधार कार्ड म्हटले जाते.

पशुसंवर्धन विभागाकडून टॅगिंगच्या नोंदी भारत पशुधन अॅपवर केल्या जातात. जिल्ह्यातील ६ लाख ३३ हजार जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे.

ई-गोपाला ॲप कायदेशीर

ई-गोपाला अॅप हे पशुपालकांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे त्यामुळे सर्वच पशुपालकांनी हे अॅप मोबाइलवर डाउनलोड करावे. या माध्यमातून आपल्या जनावरांच्या उपचार, लसीकरण, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांच्या (कृत्रिम रेतन, उत्तम प्रतीच्या वळूचे वीर्य, भ्रूण) माहितीसाठी अपडेट राहावे. - डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

जनावरांचे आजार-उपचार :

या अॅपच्या माध्यमातून संबंधित जनावरावर कोणत्या आजारासाठी उपचार करण्यात आले, कोणते लसीकरण करण्यात आले, याची माहिती मिळणार आहे.

खरेदीदारांची माहिती :

जनावरांची खरेदी- विक्री झाल्यास अगोदरच्या पशुपालकांकडून विकत घेणाऱ्या पशुपालकास 'ट्रान्सफर' अशी नोंद केली जाते.

सर्व नोंदी ठेवा मोबाइलवर :

संबंधित जनावराच्या कृत्रिम रेतन, वेतानंतर जन्माला येणाऱ्या वासरांच्या नोंदी, लसीकरणाचे अलर्ट अशा अनेक माहिती या अॅपद्वारे मोबाइलवर मिळणार आहेत.

Web Title: Put Sarja-Raja's horoscope on mobile now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.