'इको सेन्सिटिव्ह झोन' व पक्षी अभयारण्याच्या बंधनात अडकलेल्या जायकवाडी धरणावरील मच्छीमारांसमोर प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाचे नवीन संकट येऊ घातले आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्या कहार समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे या नियोजित प्रकल्पास विरोध सुरू झाला आहे.
पैठण शहरात मोठ्या संख्येने कहार समाज आहे. जायकवाडी धरणाच्या केल्याने मासेमारीच्या व्यवसायास मच्छीमार बांधवांनी जलाशयावर मासेमारी करणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. दरम्यान, पक्षी अभयारण्य घोषित झाल्यानंतर वना खात्याने बंधने टाकून अनेक वेळा मच्छीमारांवर कारवाई केल्याने मासेमारीच्या व्यवसायास घरघर लागली आहे. त्यातच सौर ऊर्जा प्रकल्पाचे संकट येऊ घातल्याने मच्छीमारांमध्ये मोठे अस्वस्थता पसरली आहे.
हा प्रकल्प रद्द करावयासाठी मच्छिमार बांधवांनी पैठण तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले की, प्रकल्पातील हजारो हेक्टर पानपसाऱ्यावर अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यातील कहार भिल्ल व भोई समाजासह इतर समाज पारंपारिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह चालवतात. या व्यवसायावर पंचवीस हजार कुटुंबे व त्यावर अवलंबून असलेल्या एक ते दीड लाख लोकांची उपजीविका चालते. जलाशयावर केंद्र व राज्य सरकारने तरंगता सौर प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्यातील मासेमारी संपुष्टात येऊन मच्छीमारांवर कायमस्वरूपी उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
9 ऑक्टोबरला पैठण मध्ये मोर्चा काढण्याचा इशारा
नाथसागरावरील या नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प रद्द न झाल्यास 9 ऑक्टोबरला का हार तसेच इतर मच्छीमार समाज बांधवांच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे.