उसाची लागण करण्यासाठी ऊस बियाण्यांची रोपे तयार करण्याचा नवा धंदा लाखो रुपयांचे उत्पन्नाचे साधन म्हणून ग्रामीण बेरोजगारांना नवीन संधी मिळवून देणारा ठरला आहे.
गगनबावडा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ऊसलागवड सुरू आहे. नवीन लागण करताना उसाच्या कांड्यांऐवजी डोळा पद्धतीने ऊस लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतो आहे. त्यामुळे डोळा तयार करण्याचे प्लॉट केले जात आहेत. अशा डोळा प्लॉटमधून हजारो रोपांची विक्री करून शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन सेवा दिली जात आहे. यातून ग्रामीण बेरोजगारांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारे साधन निर्माण झाले.
हेही वाचा- ऊस उत्पादकांमुळे धावणार भविष्यातील हायब्रीड कार
डोळा पद्धतीची रोपे वापरून ऊस उत्पादन
घेतल्यावर उसाचा चांगला उतारा मिळत आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी ऊस लागण करताना डोळा पद्धतीचे ऊस रोपे वापरतो.- बाजीराव गुरव, वेसर्डे, ता. गगनबावडा, शेतकरी
दिवसाला सुमारे ९००० रोपांची लागवड केली जाते. महिन्याला किमान सव्वालाख रोपांची लागवड होते. सर्व खर्च वजा जाता महिन्याला २०% नफा मिळतो.-विलास पाटील, किरवे- ऊस रोपवाटिका उत्पादक
हेही वाचा- एका एकरात लगडली 'बॉबी', खरबूजाची लागवड करणार शेतकऱ्याला लखपती
आधी टपरी पद्धतीने होत असे ऊस लागण
आतापर्यंत ग्रामीण भागात टिपरी पद्धतीने ऊस लागण केली जात होती. यामुळे एकरी तीन-चार टन बियाणे लागत होते. त्यामुळे खर्चही वाढत होता. आताचा उसाला मिळणारा भाव लक्षात घेऊन प्रतिएकरी तीन-चार टन बियाणे वापरणे ही परवडणारी बाब नाही. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिपरीद्वारे केलेली लागवड ही उगवण न झाल्याने पुन्हा बेडावी लागते. यातून खर्च वाढत जातो. जुन्या व प्रचलित असणाऱ्या पद्धतीने ऊसलागवड केल्यास सुरुवातीस एकरी अडीच ते तीन लाख फुटवे तयार होतात; पण प्रत्यक्षात ऊस तुटून जाताना तुलनेने खूपच कमी ऊस मिळतो. ऊस बियाणे रोपे तयार मिळतात, त्यांची उगवण क्षमता चांगली असल्याने लागवडीनंतर उगवून रोपे मोठी होण्याचा वेळ वाचण्यासाठी रोपांची लागवड खूपच फायदेशीर ठरते. शिवाय लागवड करताना अलीकडे मजुरांचा वाढलेला खच्च लक्षात घेता, निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्यांचे एक कुटुंब घरच्या घरी लागवड करू शकते. अशा पद्धतीची रोपे शेतकऱ्यांनाही स्वतःच्या शेतामध्ये तयार करता येऊ शकतात.