Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > महिलांना उद्योजक बनायचंय, शासन करेल मदत, अशी आहे योजना 

महिलांना उद्योजक बनायचंय, शासन करेल मदत, अशी आहे योजना 

The plan is that women want to become entrepreneurs, the government will help | महिलांना उद्योजक बनायचंय, शासन करेल मदत, अशी आहे योजना 

महिलांना उद्योजक बनायचंय, शासन करेल मदत, अशी आहे योजना 

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचापर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजकांसाठी नवी  कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यांनी केले आहे.

पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत व्यवसाय असल्यास संबंधित महिला उद्योजक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच, पर्यटन व्यवसायामध्ये  ५० टक्के  व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालविलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायाकरीता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याज परतावा देण्यात येईल. या योजनेसाठी व्याजाची  रक्कम १२ टक्के च्या मर्यादेत त्यांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असावे; या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येईल.

राज्यातील महिला पर्यटक उद्योजिकांनी अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in  या संकेतस्थळावर अथवा  मुख्यालय – ०२२ ६९१०७६०० क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कोकण   ९६०४३ २८०००, पुणे  ९४२३७ ७५५०४ नाशिकसाठी ९६८९९०८१११ , छत्रपती संभाजीनगर ८९९९० ९७२५५, नागपूर आणि अमरावती ८४२२८ २२०५८ / ९२२६७७९७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पर्यटन संचालनालय, पर्यटन विभाग, यांच्याकडून करण्यात आले आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: The plan is that women want to become entrepreneurs, the government will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.