पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना अनेक गोष्टींची सामाना करावा लागतो. पशुधनाची काळजी घेण्यासाठी, त्यांचा आहार आणि आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुविधा पुरवाव्या लागतात. जनावरांच्या आहारकडे आणि आरोग्यासहित इतर बाबींकडे लक्ष दिले नाही तर दुग्धव्यवसाय तोट्यात जाऊ शकतो.
तर काही गोष्टींमुळे गोठ्यातील खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. गायींचा गोठा फायद्यात राहण्यासाठी या १२ गोष्टी गोठ्यात असणे गरजेचे आहे.
फ्लेमगन - गोठ्यात माशा होऊ नये किंवा लम्पीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फायद्याची.
अॅझोला - गायी उलटणे कमी करायचे असेल आणि खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी फायद्याचे
कुटी मशीन - एक्सपोर्ट क्वालिटी कमी मेंटनन्स असलेली कुटी मशीन असणे आवश्यक आहे. लोकल कुटी मशीन लवकर खराब होतात त्यामुळे चांगल्या प्रतीची मशीन असावी.
आयुर्वेद आजीबाईचा बटवा - जनावरांना वेगवेगळ्या आजारावर घरगुती उपाय करण्यासाठी आजीबाईंचा आयुर्वेदिक बटवा असणे आवश्यक आहे.
गायचे वजन करण्यासाठी टेप - जनावरांचे वजन केल्यास त्यांना किती प्रमाणात चारा द्यावा याचा अंदाज येतो.
जनावरांच्या सडाचे आजार तपासण्यासाठी सीएमटी कीट - या कीटमुळे जनावरांच्या सडाचे होणारे संभाव्य आजार आपल्याला थांबवता येतात.
जनावरांच्या सडावर होणाऱ्या आजारासाठी प्लास्टिकचा कप आणि त्याचे सोल्यूशन - या प्लास्टिकच्या कपमुळे सडांच्या वर होणारे आजार थांबवता येतात.
गोठ्यातील दूषीत हवा बाहेर फेकण्यासाठी पंखा - छतावर पंखा लावण्याऐवजी गोठ्यातील हवा कायम खेळती राहावी आणि गोठ्यातील हवा बाहेर काढण्यासाठी मोठा पंखा आवश्यक आहे.
उन्हाळ्यातील फॉगर्स - उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे गायीच्या दुधात घट होते. त्याचबरोबर जनावरांना आरोग्याच्या समस्या उद्भवातात. त्यामुळे उष्णतेचे व्यवस्थापन करण्यासाठी फॉगर्स गरजेचे आहेत.
शेण काढण्याचे मशीन - जनावरांची संख्या जास्त असेल तर मनुष्यबळ वाचवण्यासाठी शेण काढण्याचे मशीन शेतकऱ्यांकडे असायला हवे.
मुरघास बॅग - चारा साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या मुरघास बॅग घेणे गरजेच्या आहेत.
मोबाईल अॅप - शेतकऱ्यांना पशुधनाची काळजी घेण्यासाठी आणि गोठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करणे गरजेचे आहे.
माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)