Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर

मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर

This fish which gives more weight in a short period of time is beneficial while doing fish farming | मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर

मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर

gift tilapia माशांच्या मागणीत वाढ होत असल्याने व जलवायू परिवर्तनामुळे होणारे मत्स्य व्यवसायातील बदलांमुळे मत्स्यसंवर्धनातील माशांच्या प्रजातींचे विविधता वाढवून मत्स्य उत्पादन पातळी वाढविण्यासाठी अधिक प्रजाती समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे.

gift tilapia माशांच्या मागणीत वाढ होत असल्याने व जलवायू परिवर्तनामुळे होणारे मत्स्य व्यवसायातील बदलांमुळे मत्स्यसंवर्धनातील माशांच्या प्रजातींचे विविधता वाढवून मत्स्य उत्पादन पातळी वाढविण्यासाठी अधिक प्रजाती समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चीन नंतर भारत हा मत्स्य संवर्धनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तथापी भारतातील मत्स्य पालन हे मुख्यतः कार्प मत्स्य प्रजातीच्या संवर्धनासाठी आणि काही प्रमाणात पंगस मत्स्य प्रजातींच्या संवर्धनाइतकेच सिमीत आहेत.

माशांच्या मागणीत वाढ होत असल्याने व जलवायू परिवर्तनामुळे होणारे मत्स्य व्यवसायातील बदलांमुळे मत्स्यसंवर्धनातील माशांच्या प्रजातींचे विविधता वाढवून मत्स्य उत्पादन पातळी वाढविण्यासाठी अधिक प्रजाती समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे.

आजच्या मत्स्य संवर्धन प्रणालींमध्ये गिफ्ट तिलापीया समाविष्ट करणे फायदेशीर आहे. संपूर्ण जगात सर्वात जास्त मत्स्यसंवर्धन केला जाणारा मासा आहे. परिणामी गिफ्ट तिलापीया संवर्धन दर दिवसेंदिवस वाढत आहे.

नाईल तिलापीया (शास्त्रीय नाव Oreochromis niloticus) माशाच्या जातीपासून निवड पैदास (Selective breeding) पद्धतीने GIFT (Genetically Improved Farmed Tilapia) अनुवंशिकदृष्ट्या सुधारित तिलापीया मासा विकसित केला आहे. ह्या जातीला सुपर तिलापीया/चिलापी असेही म्हणतात.

गिफ्ट तिलापीया माशांची वैशिष्ट्ये
१) सर्व प्रकारचे पूरक खाद्य खातो. कृत्रिम खाद्याला उत्तम प्रतिसाद.
२) पाण्यातील किंवा वातावरणातील बदलांस सहनशील.
३) संवर्धन कालावधी कमी ६ ते ७ महीन्यात ६५० ग्रॅम वाढ.
४) २०० ग्रॅम वजनाचा मासा सुद्धा विकला जातो.
५) मत्स्यबीज संचयन घनता देखील जास्त ठेवता येते.
६) बारमाही तलावात तीन वेळा तिलापीया जातीच्या माशांचे संवर्धन करणे शक्य आहे.
७) अन्य कोणत्याही मत्स्य जातीपेक्षा झपाट्याने वाढ होते.
८) चांगली रोग प्रतिकारक क्षमता व जगनूकीचे प्रमाण जास्त असते.
९) माशांची चव अतिशय उत्तम आणि काट्याचे प्रमाण अत्यल्प.
१०) जिवंत स्थितीत बाजारात नेता येतो त्यामुळे चांगला दर मिळतो.

अधिक वाचा: तळ्यातील मत्स्यपालनातून कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी असे करा व्यवस्थापन

Web Title: This fish which gives more weight in a short period of time is beneficial while doing fish farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.