Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > यंदा भाताचे पीक उत्तम; शेतकऱ्यांकडून पोहे बनविण्यास पसंती

यंदा भाताचे पीक उत्तम; शेतकऱ्यांकडून पोहे बनविण्यास पसंती

This year the rice crop is good; Farmers prefer to make poha | यंदा भाताचे पीक उत्तम; शेतकऱ्यांकडून पोहे बनविण्यास पसंती

यंदा भाताचे पीक उत्तम; शेतकऱ्यांकडून पोहे बनविण्यास पसंती

यंदा भात पीक चांगल्या प्रकारे हाती आले आहे. ऑक्टोबर अखेर हळव्या जातीच्या भाताची कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या औचित्यावर शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या भातापासून पोहे बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

यंदा भात पीक चांगल्या प्रकारे हाती आले आहे. ऑक्टोबर अखेर हळव्या जातीच्या भाताची कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या औचित्यावर शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या भातापासून पोहे बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

डहाणू फोर्ट येथील पोहा गिरणी परिसरात नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी कुटुंबांच्या रांगा दिसत आहेत. यंदा भाताचे उत्पादन समाधानकारक आल्याने स्वतः पिकवलेल्या भातापासून दर्जेदार पोहे करून घेण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील भात उत्पादनात घट होत होती. त्यामुळे पोह्यांसाठी भात कसे वेगळे काढायचे,
हा प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर होता. यंदा भात पीक चांगल्या प्रकारे हाती आले आहे. ऑक्टोबर अखेर हळव्या जातीच्या भाताची कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या औचित्यावर शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या भातापासून पोहे बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

कसे केले जातात पोहे आणि कुठे आहे मागणी?
- डहाणू तालक्यातील फोर्ट परिसरात पोहा गिरणी आहे. १९८१ साली के, रामचंद महादेव जोशी यांनी ही गिरणी सुरू केली होती. येथे जाड आणि पातळ (पेपर) या दोन प्रकारचे पोहे बनविले जातात. याकरिता गुजरी जातीच्या भाताची आवश्यकता असते.
- दगडी पोह्यांकरिता हे भात गरम पाण्यात तीन तास भिजविण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते भाजले जाते. त्यापासून थोडेसे गोलसर आकारातील आणि जाड पोहे मिळतात. या पोह्यांना चिवडा बनविण्यासाठी मुंबईच्या बाजारात मोठी मागणी आहे.
विशेषतः मुंबईतील लालबागच्या प्रसिद्ध चिवडा गल्लीमध्ये मिळणारा विविध प्रकारचा चिवडा बनविण्यासाठी डहाणू येथीलच जाड आणि पातळ पोह्यांची निर्यात केली जाते, तर पातळ (पेपर) पोह्यांसाठी भात थंड पाण्यात भिजविले जाते. त्यालाही चांगली मागणी आहे.

गुजरी भात कुठून येतो?
गुजरी भात गुजरातच्या नवसारीतून येतो. या भातापासून उत्तम पोहे बनतात. पूर्वी डहाणू तालुक्यातील डोंगरी पट्ट्यातून स्थानिक आदिवासीकडून या जातीचे भात मोठ्या प्रमाणात उपलब्ध शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. व्हायचे. मात्र, हल्ली हायब्रीड बियाण्यांकडे पोह्यासाठी लागणारा भात गुजरातच्या नवसारी येथून आणला जातो.

आहार आणि पोहे
• खरीप हंगाम संपला असून, घरच्या भातापासून बनवलेले पोहे बनविण्याला स्थानिक पसंती देत आहेत. घरच्या भातापासून बनलेले पोहे चविष्ट असतात.
• पोह्यात साखर घालून किंवा चहासोबत तसेच कांदापोहे करूनही खाता येतात. हा नाश्ता म्हणून चांगला पर्याय असल्याने प्राधान्य दिले जाते.
• पोह्यांच्या सेवनाने कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात.
• सर्व कुटुंबासाठी हा पूरक नाश्ता असल्याने डहाणू आणि तलासरीतील आदिवासी कुटुंब हा पर्याय स्वीकारतात.

 

Web Title: This year the rice crop is good; Farmers prefer to make poha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.