Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Farming Tools: आंतरमशागत खर्च आणि श्रम कमी करायचेत तर वापरा ही अवजारे

Farming Tools: आंतरमशागत खर्च आणि श्रम कमी करायचेत तर वापरा ही अवजारे

Use these tools to reduce intercultural operations and labor cost | Farming Tools: आंतरमशागत खर्च आणि श्रम कमी करायचेत तर वापरा ही अवजारे

Farming Tools: आंतरमशागत खर्च आणि श्रम कमी करायचेत तर वापरा ही अवजारे

Farming Tools: सद्यस्थिती पाहता मजुराचा तुटवडा आणि वेळेत काम होणे ह्या अडचणीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आंतरमशागतीचे कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणामध्ये विविध अवजारे वापरणे जरुरीचे ठरेल.

Farming Tools: सद्यस्थिती पाहता मजुराचा तुटवडा आणि वेळेत काम होणे ह्या अडचणीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आंतरमशागतीचे कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणामध्ये विविध अवजारे वापरणे जरुरीचे ठरेल.

शेअर :

Join us
Join usNext

शेतीच्या मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी आधुनिक यंत्र सामुग्री जवळपास सर्वच शेतकरी वापरू लागले आहेत. याचबरोबर शेतीमध्ये होणार आंतरमशागतीचा खर्च कमी करावयाचा असेल तर शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठे, केंद्रीय संस्था, वेगवेगळ्या कंपन्या यांची संशोधित स्वयंचलित अवजारे आजकाल बाजारात उपलब्ध आहेत.

तसेच मजुरांचा अपुरा पुरवठा यामुळे काही संशोधक शेतकऱ्यांनी अंतर मशागतीचे अवजारे देखील तयार केले आहेत. शेतामध्ये, बांधावर तसेच रस्त्याकडेला वाढणारे तण ही शेतकऱ्यांपुढील मोठी समस्या आहे. हे वाढलेले तण वेळोवेळी काढणे गरजेचे असते. जेणेकरून पिकातील गवात पिकाशी खत, पाणी, सूर्यप्रकाश इ. साठी स्पर्धा करत नाही.

१) वैभव विळा
गहू, ज्वारी व गवत इ. कापणी जमिनीलगत करता येते. दातेरी पत्यामुळे या विळ्याला धार लावायची गरज नाही. वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असून समतोल साधून सहज कापणी होते. एका तासामध्ये २ गुंठ्याची कापणी करता येते.

२) दातेरी हात कोळपे
पिकाच्या दोन ओळीत निंदनी करण्यासाठी, मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हाताने मागे पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो व मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते. कोळप्याचे पाते १५ सेमी. लांबीचे असते. त्यामुळे दोन ओळींत १५ से.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकातसुधा या कोळप्याने निंदनी, खुरपणी करता येते.

कोळप्यामुळे साधारणपणे ३ से.मी. खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होते.सर्व प्रकारच्या पिकात आणि सर्व प्रकारच्या हलक्या,मध्यम तसेच भारी जमिनीत कोळपे सारख्या क्षमतेने वापरता येते.या हातकोळप्याचे वजन कमी म्हणजे ७ किलो असल्याने सहज उचलून नेता येते.एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदनी-खुरपणी करू शकतो.

३) सायकल कोळपे
याचा उपयोग १५ से.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदनी, खुरपणी करण्याकरता होतो. ५ ते ७ सेमी. पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते. एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदनी, खुरपणी सहजपणे करू शकतो.

४) मोगी कोळपे
याचा उपयोग २० सेमी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, नोंदणी करण्यासाठी होतो. या द्वारे मातीसुद्धा लावता येते. या कोळप्याबरोबर तीन वेगवेगळे पास दिलेले आहेत ज्याच्या वापर पिकाच्या दोन ओळीतील अंतरानुसार करत येतो.

५) पॉवरवीडर
लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो. भारतातील शेतीयोग्य जमीनीचे क्षेत्रफळ जवळपास  एकूण जमीनीच्या ५६.७८% एवढे आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या शहरीकरणामुळे भारतातील शेतीयोग्य जमीनीचे क्षेत्रफळ सतत घटत आहे.

कृषी मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने शेतकरी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात; परंतु त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल.

पॉवर वीडर हे ओळ पद्धतीने लावल्या जाणाऱ्या पिकात, उद्यानविद्या आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते. ज्या पिकांच्या सरींमधील अंतर ६०-७० सेंमी. पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढणीसाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इत्यादी विविध पिकांसाठी आपण पॉवर वीडरचा वापर करू शकतो. विविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत. पॉवर वीडर मध्ये इंजिन, इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल इ. भाग आहेत

पॉवर वीडर ची कार्य रुंदी (इंच)

१२-३९

अश्वशक्ती

२-७

ब्लेड संख्या

८-२४

इंधन

पेट्रोल किंवा डिझेल 

पॉवर ट्रान्समिशन

चेन किंवा बेल्ट द्वारे

वजन (कि.ग्रॅ)

५०-६०

स्टिअरिंग उंची  

आवश्यकतेनुसार बदलता येते

इंधन क्षमता

८०० एम.एल ते १ लिटर/तास

कार्य खोली (इंच)

४-६

पॉवर विडरची वैशिष्ट्ये
१) बहुपयोगी
२) वजनाने हलके
३) आकाराने लहान
४) वापरायला सोपे
५) उत्कृष्ट कार्यक्षमता

- इंजि.वैभव रा.सूर्यवंशी
विषय विशेषज्ञ, कृषि शक्ती व अवजारे अभियांत्रिकी
कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म जळगाव
९७३०६९६५५४

Web Title: Use these tools to reduce intercultural operations and labor cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.