पावसाळ्याच्या कालावधीत गाय व म्हैसवर्गीय पशुधनात घटसर्प, फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची अधिक भीती असते. वेळीच उपचार न झाल्यास पशुधन दगावूही शकते. त्यामुळे हे आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मे महिन्यापासून जिल्हाभरात लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यात गायवर्गीय पशुधन २ लाख ५५ हजार तर म्हैसवर्गीय पशुधन २ लाख ५७ हजार आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण १२९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या जनावरांमध्ये घटसर्प तसेच फन्ऱ्या रोगाची लागण होण्याची अधिक भीती असते. वेळेवर उपचार न झाल्यास पशुधन मृत्युमुखीही पडू शकते. जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढावी. तसेच हे आजार उद्भवल्यास त्यावर मात करता यावी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत तीन महिन्यांवरील गाई, म्हशीच्या वासरांनाही लसीकरण करण्यात येत आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. गावोगावी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याने सोय झाली आहे.
३ लाख ३१ हजार लसी उपलब्ध...
* पहिल्या टप्प्यात शासनाकडून पशुसंवर्धनच्या सहायक आयुक्त कार्यालयास घटसर्पच्या १ लाख ७६ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच फऱ्याच्या १ लाख १६ हजार तर घटसर्प आणि फयाच्या एकत्रित अशा ३९ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या मे महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
पशुधनास ताप येते, चारा कमी खाते
फया, घटसर्पामुळे पशुधनात ताप येणे, एका पायाने अथवा चारही पायाने लंगडणे, चारा कमी खाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घशातून घरघर असा आवाज येणे अशी लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न मिळाल्यास पशुधन मृत्युमुखीही पडू शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. सूर्यकांत नागरगोजे यांनी सांगितले.
प्रत्येक पशुधनास लस देणे गरजेचे...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाय, म्हॅसवर्गीय पशुधनात घटसर्प, फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वाधिक भीती असते. वेळेत उपचार न मिळाल्यास पशुधन दगावण्याची अधिक भीती असते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण करून घ्यावे, तसेच पशुधनाचे आधारकार्ड घ्यावे - डॉ. सूर्यकांत नागरगोजे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन