Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > जनावरांत खनिज मिश्रणाची कमतरता असेल तर काय आढळतात लक्षणे

जनावरांत खनिज मिश्रणाची कमतरता असेल तर काय आढळतात लक्षणे

What are the symptoms of mineral deficiency in animals? | जनावरांत खनिज मिश्रणाची कमतरता असेल तर काय आढळतात लक्षणे

जनावरांत खनिज मिश्रणाची कमतरता असेल तर काय आढळतात लक्षणे

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पण पाहूया.

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पण पाहूया.

शेअर :

Join us
Join usNext

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात.

जनावरांच्या आहारात त्या त्या प्रदेशात किंवा गावात आढळणारा विविध प्रकारचा चारा, हिरवे गवत, कडबा, हंगामानुसार उसाचे वाडे तसेच इतर संकरित चारा पिकांचा समावेश होतो. 

खनिज मिश्रणावरचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल यासाठी पशुपालकांनी योग्य वेळीच खनिज मिश्रणाचे महत्व जाणून घेणे गरजेचे असते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पण पाहूया.

खनिज मिश्रणाच्या कमतरतेमुळे आढळणारी लक्षणे 
● वासरांची जलद गतीने वाढ होत नाही.
● शरीरावरील केस उभे राहतात, तेज दिसत नाही, त्वचा खडबडीत होते, त्वचेचे आजार वाढतात.
● जनावर दूध देत नाही किंवा लवकर आटते.
● जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते गाई-म्हशी लहान वासरे यामध्ये अंधत्व येते भाकड कालावधी वाढतो.
● वर्षाला एक वेत मिळत नाही गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते तसेच तात्पुरते किंवा कायमचे वांझपण येते.
● जनावर माज वेळेवर दाखवत नाही, माजाचा काळ कमी जास्त होतो, लक्षणे कमी दाखवते.
● गाई-म्हशींच्या सडांची तोंड लवकर बंद न झाल्याने काससुजी होते.
● तसेच गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर सडातून दूध सतत टपकत असते.
● दुधातील स्निग्धपदार्थांचे प्रमाण कमी होऊन दुधाची प्रत खालावते.
● सडांवर चिरा पडतात, जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. धार काढताना जनावर लाथ मारते. 
● जनावर व्यायल्यानंतर 'कॅल्शियम' कमी होते त्याची वेळीच पूर्तता झाली नाही तर 'मिल्क फिव्हर' होतो. तसेच वेळेत उपचार न केल्यास जनावर दगावते.
● 'केटोसिस' आजार होतो मायांग बाहेर पडते उपचार न झाल्यास जनावर दगावते.
● गाई-म्हशी विताना वासरू अडकण्याचा संभव असतो तसेच व्यायल्यानंतर वार लवकर पडत नाही. 
● नवजात वासराचे वजन कमी भरते, अपूर्ण दिवसांचे वासरू जन्माला येते.
● जनावराला खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जनावर चप्पल, पिशव्या, रबर, माती, अशा अखाद्य वस्तू खाते त्यामुळे त्यांच्या पचन संस्थेत बिघाड होतो.

प्रतिबंधात्मक उपाय
● दूध उत्पादन व प्रजनन यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाची खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात आहारात असणे गरजेचे आहे
● नवीन जातीच्या सकस वैरणी तयार करणे आपल्या भागातील जमिनीतील खनिजांची कमतरता ओळखून परिपूर्ण घटक असणारी खनिज मिश्रणे खरेदी करावीत.

खनिज मिश्रण वापरण्याचे प्रमाण (प्रति-दिन)
लहान वासरे २० ते २५ ग्रॅम मोठ्या कालवडी ५० ग्रॅम दुभती जनावरे ५० ते १०० ग्रॅम.

अधिक वाचा: पशुधन सल्ला; उन्हाळ्यात जनावरांचे संरक्षण आणि उपाययोजना

Web Title: What are the symptoms of mineral deficiency in animals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.