Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Livestock Management : गाई म्हशीतील असंसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा? वाचा सविस्तर

Livestock Management : गाई म्हशीतील असंसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा? वाचा सविस्तर

What causes non-communicable abortion in cows and buffaloes and how can it be prevented? Read in detail | Livestock Management : गाई म्हशीतील असंसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा? वाचा सविस्तर

Livestock Management : गाई म्हशीतील असंसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा? वाचा सविस्तर

Husbandry Management : साधारणपणे गाय-म्हैस गाभण काळातील पूर्ण दिवस न घेता विण्यापूर्वीच जर गर्भ बाहेर फेकला तर त्याला जनावर गाभडणे किंवा गर्भपात झाला असे म्हणतात.

Husbandry Management : साधारणपणे गाय-म्हैस गाभण काळातील पूर्ण दिवस न घेता विण्यापूर्वीच जर गर्भ बाहेर फेकला तर त्याला जनावर गाभडणे किंवा गर्भपात झाला असे म्हणतात.

शेअर :

Join us
Join usNext

साधारणपणे गाय-म्हैस गाभण काळातील पूर्ण दिवस न घेता विण्यापूर्वीच जर गर्भ बाहेर फेकला तर त्याला जनावर गाभडणे किंवा गर्भपात झाला असे म्हणतात.

गर्भाशयाबाहेर फेकलेला गर्भ जिवंत किंवा मृत असू शकतो. गर्भपात होण्याच्या कारणांचा विचार केला तर त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक संसर्गजन्य रोगामुळे होणारा गर्भपात व दुसरा असंसर्गजन्य गर्भपात. आज आपण असंसर्गजन्य गर्भपाताबद्दल माहिती घेणार आहोत.

गाई म्हशीच्या गर्भधारणेनंतर अगदी प्रथमावस्थेपासून शेवटच्या महिन्यापर्यंत केव्हाही गर्भपात होऊ शकतो. मुळातच गर्भाशय हे गर्भाची संपूर्ण काळजी घेत असते.

त्याचे पोषण, वाढ, संरक्षण इत्यादी सर्व बाबी गर्भाशयामार्फत केली जातात. तथापि गर्भ जर मृत्यू पावला किंवा मृत होण्याच्या मार्गावर असेल तर मात्र गर्भाशय असे गर्भ आपल्या गर्भात न ठेवता बाहेर टाकत असते.

असंसर्गजन्य गर्भपाताची कारणे
१) अनेक वेळा गाभण जनावरे खरेदी केल्यानंतर खूप दूर अंतरावरून चालवत आणली जातात. वाटेत त्याला योग्य आहार, पाणी आणि विश्रांती जर मिळाला नाही तर अशावेळी मोठ्या प्रमाणात थकवा जाणवून गर्भपात होऊ शकतो.
२) अनेक वेळा गायी म्हैशी वाहनातून आणली जातात. अशावेळी क्षमतेपेक्षा जास्त जनावरे वाहनात भरल्यास एकमेकांना मारणे, पोटावर प्रहार करणे, घसरणे, पडणे यामुळे देखील गर्भपात होतात.
३) अनेक वेळा विषारी द्रव्ये, रासायनिक पदार्थ काही औषधामुळे देखील जनावरात गर्भपात होतो. अशी विषारी द्रव्ये पाण्यातून जनावरांच्या पोटामध्ये जाऊ शकतात. कीटकनाशके, शेतात-बागेत फवारले जाणारे औषध देखील गर्भपातास कारणीभूत ठरते.
४) विषारी वनस्पती धोतरा, बेशरम यासह ज्वारीचे पीक घेतल्यानंतर येणारे फुटवे खाण्यात आले तरी देखील गर्भपात होतो.
५) सडलेले धान्य, बुरशीयुक्त कडबा व मुरघास याने देखील गर्भपात होतो.
६) गाभण जनावरांचे दूध बंद झाल्यानंतर अनेक पशुपालक सकस व संतुलित आहार देत नाहीत. त्यामुळे योग्य पोषणतत्वे न मिळाल्याने गाभण जनावर अशक्त होतात व गाभडतात.
७) अ जीवनसत्व, फॉस्फरस व  आयोडीन हे महत्त्वाचे अन्नघटक जर मिळाले नाहीत तरी देखील गर्भपात होतो.
८) अनेक वेळा गाभण जनावरे प्राथमिक अवस्थेत माजाची लक्षणे दाखवतात. अशावेळी कृत्रिम रेतन करताना हे लक्षात न आल्याने गर्भपात होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक वेळी माजाची लक्षणे कशी असतात त्यांचे निरीक्षण करूनच खात्री करावी मगच कृत्रिम रेतनासाठी दवाखान्यात गाय-म्हैस घेऊन जावे.
९) अनेक वेळा गाय-म्हैस गाभण गेल्यानंतर महिन्याभरातच प्राथमिक अवस्थेत गर्भ आतल्या आत शोषला जातो किंवा जिरतो. अशावेळी गाय म्हैस दीड ते दोन महिन्यांनी पुन्हा माजावर येते. यावेळी आपण जनावर उलटले असे समजतो. पण सदर गर्भ हा मरण पावून त्याचे गर्भाशयात शोषण होते. त्याला Early Embryonic Death असे म्हणतात.

असंसर्गजन्य गर्भपात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी
१) गाभण काळात वाहतूक करताना, पशुखाद्य व वैरण घालताना काळजी घ्यावी.
२) तसेच बाहेर चरायला सोडत असल्यास चौकस राहून कोणत्याही परिस्थितीत विषारी द्रव्य असणारे पाणी किंवा बुरशी युक्त वैरण खाण्यात येणार नाही व विषारी युक्त वनस्पती खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे आपण आपल्या जनावरांचा गर्भपात टाळू शकतो.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: गाय म्हैस का व कशी आटवतात? अन् आटवणं किती महत्त्वाचं आहे.. वाचा सविस्तर

Web Title: What causes non-communicable abortion in cows and buffaloes and how can it be prevented? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.