बहू उद्देशीय ठिबक सिंचन ! होय ! हे अगदी सहज शक्य आहे! जैन इरिगेशन कडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ठिबक सिंचन संच खरेदी करताना ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे तांत्रिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या वापर केला पाहिजे, ठिबक सिंचन संचा मधील सर्व घटकांची गुणवत्ता उत्कृष्ट निवड केली पाहिजे, इनलाइन ठिबकच्या नळयातील ड्रिपर्स मधील अंतर आणि प्रत्येक ड्रिपर्स चा प्रवाह एक समान मिळायलाच हवा. ठिबक सिंचन संच शेतामध्ये उभारणी करण्यापूर्वी शेताचा सर्व्हे केला पाहिजे, त्या नंतर डिझाईन केले पाहिजे आणि त्या नंतर ठिबक सिंचन संचाची शेतामध्ये उभारणी करण्यात यावी.
ठिबक सिंचन च्या दोन इनलाईन नळ्यातील अंतर ४.५ ते ५ फुट निवड करावी. दोन ड्रिपर मध्ये अंतर ४० सेमी व ड्रिपरचा प्रवाह ४ लिटर प्रती तास असावा. जैन इरिगेशन कडे अतिशय उत्तम गुणवत्तेच्या इनलाइन उपलब्ध आहेत. शासकीय अनुदान वाल्या (जैन टर्बो एक्सेल, जैन टर्बोलाईन सुपर) आणि कमी खर्चावाल्या (जैन टर्बोस्लिम, क्लास वन) सुद्धा १२, १६, २० मिमि व्यासामध्ये उपलब्ध आहेत.
ठिबक सिंचन सोबत पाण्यात विरघळणारी खते देण्यासाठी व्हेंचूरी किंवा फर्टिलायझर टॅन्क बसवून घ्यावी. ह्या मध्ये तडजोड करू नये. अशा ठिबक सिंचन संचाचा वापर १०० + पिकांसाठी करता येऊ शकतो. त्यामध्ये नगदी पिके (ऊस, कापूस), तृणधान्ये, कडधान्ये, तेलबीया,फळ पिके, भाजीपाला, फुलशेती, औषधी सुगंधी वनस्पती पिके, वन पिके, चारा पिके, शोभीवंत रोपे/झाडे ह्या करीता निवड केलेल्या ठिबक सिंचन संचामध्ये फारसा बदल न करता सहज वापर करता येऊ शकतो. त्या करीता अंतर काय ठेवावे? पिकांना पाणी किती द्यावे? संच किती वेळ सुरू करावा. पिकांना ठिबक सिंचन संच मधून खते कोणती व कशी द्यावीत ह्या करीता शेतकऱ्यांनी आमच्या सोबत संपर्क करावा.
डॉ. बी. डी. जडे
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ , जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.