Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > दूध व्यवसायात करायची आहे प्रगती; मग हे विसरून चालणार नाही!

दूध व्यवसायात करायची आहे प्रगती; मग हे विसरून चालणार नाही!

You want to make progress in the milk business; then you will not forget this! | दूध व्यवसायात करायची आहे प्रगती; मग हे विसरून चालणार नाही!

दूध व्यवसायात करायची आहे प्रगती; मग हे विसरून चालणार नाही!

दुधाळ जनावरांचे संगोपन ही गोष्ट संपूर्णपणे शास्त्रीय बाब आहे. जेव्हा जनावराच्या प्रकृतीमानात किंवा दूध उत्पादनात फराक पडतो. तेव्हा ती तुमच्या संगोपनाचाच दोष असती हे ध्यानी घ्यावे. त्या दृष्टीने तुमचे व्यवसाय विषयक ज्ञान वाढविले पाहिजे, त्यासाठी  मिळेल तेथून व्यवसायाचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवावे.

दुधाळ जनावरांचे संगोपन ही गोष्ट संपूर्णपणे शास्त्रीय बाब आहे. जेव्हा जनावराच्या प्रकृतीमानात किंवा दूध उत्पादनात फराक पडतो. तेव्हा ती तुमच्या संगोपनाचाच दोष असती हे ध्यानी घ्यावे. त्या दृष्टीने तुमचे व्यवसाय विषयक ज्ञान वाढविले पाहिजे, त्यासाठी  मिळेल तेथून व्यवसायाचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवावे.

शेअर :

Join us
Join usNext

निरोगी जनावरेच आपले खाद्य नियमित खाऊन त्याचे रुपांतर दुधात करतात. दुग्ध व्यवसायात दूध हेच प्रमुख उत्पादन आहे. ते सातत्याने वाढत्या प्रमाणात यावयास पाहिजे तरच व्यवसाय योग्य मागनि चालतो आहे असे म्हणता येईल, त्यासाठी जनावरांच्या खाण्यापिण्याच्या योग्य व्यवस्थेबरोबरच आणखी काही महत्वाच्या गोष्टी देखील लक्षात घेतल्या पाहिजेत. अशा गोष्टींचा उल्लेख येथे संक्षेपाने केला आहे.

१) आपल्या व्यवसायाची आखणी शास्त्रशुध्द पध्दतीने करावी. व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी गरजेपूर्वीच हाती येतील अशा पध्दतीने नियोजन असावे, आपल्याकडे खुराक, वैरण काही नियमित लागणारी औषधे यांचा आवश्यक साठा कायम असावा. रोजच्या कामाचीही आखणी शिस्तशीरपणे केलेली असावी.

२) चरण्यासाठी गायी बाहेर सोडल्यावर रोजच्या रोज गोठा स्वच्छ झाडून शेण, मूत्र, कचरा आदी काढून ते सारे खडयात नेऊन टाकावे. गोठा फरशीचा असेल तर दूध काढून जनावरे चरावयास सोडल्यावर तो स्वच्छ धुऊन घ्यावा, धुतल्यानंतर १० लिटर पाण्यात १० मि.ली. फिनाईल टाकून ते पाणी फरशीवर शिंपडावे परंतु गोठा मातीचा असेल तर जमीन स्वच्छ केल्यानंतर त्या जमिनीवर ५ टक्के लिंडेन पावडर घुरळावी, अशा कामासाठी एखादे पुरेशा आकाराचे डस्टर आपल्या संग्रही कायमचे असावे.

तसेच आठपंधरा दिवसातून एकदा गोठ्याच्या भिंतीवरही मॉलेथिऑन औषधी फवारून घ्यावी. म्हणजे तेथे बसलेल्या पिसवा, गोचीड, ढेकूण यांचा नाश होईल. हे किटकनाशक जनावरांना व माणसांना कमी अपायकारक आहे. तेव्हा त्यांचाच वापर करावा.

३) गायींना दिवसातून एकदा (साधारणतः सकाळी ११-१२ वाजे दरम्यान) धुऊन घ्यावे. रोज सायंकाळी त्यांना खरारा करावा. गोचीड, पिसवा इत्यादीचा प्रतिबंधासाठी ४-८ दिवसांनी जनवारांच्या अंगावर ५ टक्के कार्बारिल पावडर शक्यतो संध्याकाळी दूध काढल्यानंतर धुरळावी. दोन-तीन महिन्यातून एकदा तरी आपल्या जनावराला जंतुनाशक औषध द्यावे.

४) दररोज १० लिटरपेक्षा अधिक दूध देणान्या गायीची धार दिवसातून तीन वेळा (सकाळ, दुपार व संध्याकाळ) काढावी. म्हणजे संकरित जनावरांना नेहमी होणारे कासेचे रोग आपल्या गायींना सहसा होणार नाही.

५ ) कळपाचे आरोग्य सतत उत्तम राहील याकडे जागरुकतेने लक्ष पुरवावे. दरवर्षी हंगामानुसार उद्भवणाऱ्या रोगाच्या साथी येण्यापूर्वीच त्या त्या रोगाच्या प्रतिबंधक लसी जनावरांना न चुकता टोचून घ्याव्यात.

तसेच आनुवांशिकदृष्टया दोषपूर्ण, खुरटी, कमजोर प्रकृतीची, रोगाला चटकन बळी पडणारी, कमी उत्पादन देणारी जनावरे शक्य तितक्या लवकर कळपातून काढून टाकावीत.

पशुपालकांनो वेळीच घ्या खबरदारी; लम्पीने होईल मोठी हानी

६) दुधाचे उत्पादन कायम वाढते ठेवण्यासाठी आपल्या कळपातील २/३ पेक्षा अधिक अनवारे तरुण असली पाहिजेत, त्यासाठी नवीन कालवडी येताच जून्या, अल्प उत्पादक किवा फार वय झालेल्या गायी दरवर्षी विकाव्यात.

७) सर्व जनावरांची नंबर किंवा नावावर नोंद ठेवावी. त्यात कालवडीचा जन्म, तिच्या वंशावळीची माहिती, कालवडीची झालेली वाढ, तिचे पहिले वेत प्रत्येक बेतात तिने दिलेले दुध यांची नोंद ठेवणे हिताचे ठरते.

८) संकरित जनावरे सार्वजनिक गायरानावर कधीही नेऊ नयेत. कारण आपल्या देशात जनावरांचे संगोपन अद्याप निट केले जात नाही. त्यामुळे अनेक रोगग्रस्त जनावरे तेथे चरत असतात आणि ती आपल्या जनावरांत मिसळल्याने त्यांच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या गुरांना होऊ शकतो.

आपल्या गुरांसाठी स्वतःचे चराई रान तयार करावे, त्या रानात उत्तम व कसदार जातीच्या गवताची लागवड करावी. ती गवते सुमारे वीतभर वाढल्यावर किंवा फुलावर आल्यावर तेथे आपली जनावरे चरावयास सोडावीत. ही चराईसुध्दा सरसकट रानाच्या सर्व भागात एकदम करु नये. रानाचे प्लॉट पाडावेत व एकेका प्लॉटमध्ये काही दिवस गुरे चारत पुढे पुढे जावे. म्हणजे गवताची नासाडी न होता ते बरेच दिवस पुरेल.

९) 'ब्रुसलोसिस' या रोगाने एखाद्या जनावराचा गर्भपात रानात झाला असेल तर अशा रानात आपली जनावरे अजिवात सोडू नयेत कारण हा रोग सांसर्गिक असून तो फार भयंकर आणि अतिशय नुकसानकारक आहे.

१०) पशु वैद्यकाशी स्नेहाचे संबंध ठेवावेत कारण त्यांची या व्यवसायासाठी नेहमीच गरज लागत असते.

दुधाळ जनावरांचे संगोपन ही गोष्ट संपूर्णपणे शास्त्रीय बाब आहे. जेव्हा जनावराच्या प्रकृतीमानात किंवा दूध उत्पादनात फराक पडतो. तेव्हा ती तुमच्या संगोपनाचाच दोष असती हे ध्यानी घ्यावे. त्या दृष्टीने तुमचे व्यवसाय विषयक ज्ञान वाढविले पाहिजे, त्यासाठी  मिळेल तेथून व्यवसायाचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवावे, आपल्या व्यवसाय विषयक एकूण कार्यपध्दतीत आढळून आलेल्या किंवा तज्ज्ञ मंडळींनी दाखवून दिलेल्या उणिवा दूर कराव्यात.

डॉ. श्रीकांत मोहन खुपसे
सहायक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर मो. नं. ८६०५५३३३१५
व 
डॉ. एन एम मस्के 
प्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर

Web Title: You want to make progress in the milk business; then you will not forget this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.