Lokmat Agro >शेतशिवार > येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे

100% subsidy for battery operated spray pump to farmers in yeola taluka | येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वितरण योजनेसाठी ऑन लाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वितरण योजनेसाठी ऑन लाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वितरण योजनेसाठी ऑन लाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधून सोडत काढून कापूस पिकासाठी ३१, सोयाबीन पिकासाठी २०१ व इतर ११३ असे येवला तालुक्यात ३५० पंपाचे लाभार्थी निवडण्यात आल्याचे येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी सांगीतले. 

पंपाचे वितरण मंडळ कृषी अधिकारी अंदरसुल हितेंद्र पगार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडल कृषी अधिकारी येवला कलमुद्दीन सिद्दीकी, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल सोनवणे, मारुती कदम तसेच कृषी सहाय्यक संजय मोरे, बाळासाहेब आघाव, चंद्रकांत जाधव, नवनाथ साखरे, संतोष गोसावी, सुरेश पाडेकर व मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

Web Title: 100% subsidy for battery operated spray pump to farmers in yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.