Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

107 crores as a reserve from margin loans of these five factories in the state, ordered by the High Court | राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत.

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत.

पण उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत १०७.६९ कोटी रुपये राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उर्वरित ४८७.०७ कोटी वितरित करण्यात आले.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध करून दिले जाते.

राज्य शासनाच्या हमीवर पहिल्या टप्प्यात पाच साखर कारखान्यांना ५९४ कोटी ७६ लाख रुपयास मंजुरी मिळाली; पण रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरूर यांनी राज्य शासनाच्या हमीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर, सुनावणी होऊन न्यायालयाने पाच कारखान्यांना दिलेल्या ५९४ कोटी ७६ लाखांपैकी १०७ कोटी ६९ लाख रुपये राखीव ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाच कारखान्यांची सम प्रमाणात रक्कम राखीव ठेवून उर्वरित रक्कम संबंधितांना वाटप करण्यात आली आहे.

असे मिळणार कारखान्यांना मार्जिन मनी लोन

कारखानामार्जिन मनी लोन रक्कमराखून ठेवलेली रक्कम
विश्वासराव नाईक, चिखली सांगली६५ कोटी११.७० कोटी
नागनाथ नायकवडी, हुतात्मा वाळवा१४८.९० कोटी२७.५६ कोटी
अशोक, श्रीरामपूर अहमदनगर९०.३० कोटी१६.२५ कोटी
विठ्ठल, वेणूनगर पंढरपूर२६७.५९ कोटी४८.०५ कोटी
शेतकरी, किल्लारी औसा, लातूर२२.९७ कोटी४.१३ कोटी

कर्जाच्या परतफेडीचा कालावधी आठ वर्षे
साखर कारखान्यांना दिलेले कर्ज परतफेडीचा कालावधी आठ वर्षे राहणार आहे. सुरुवातीची दोन वर्षे विलंब कालावधी असेल; मात्र या कालावधीत व्याजाची रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुद्दल व व्याजाची वार्षिक समान सहा हप्त्यात (हंगाम २०२६-२७ ते २०३१-३२ पर्यंत) परतफेड करायची आहे.

अधिक वाचा: Loan for Sugar Factories in Maharashtra : कर्ज परतफेडीच्या जबाबदारीने कारखान्याचे संचालक धास्तावले

Web Title: 107 crores as a reserve from margin loans of these five factories in the state, ordered by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.