Join us

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:21 PM

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत.

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत.

पण उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत १०७.६९ कोटी रुपये राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उर्वरित ४८७.०७ कोटी वितरित करण्यात आले.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध करून दिले जाते.

राज्य शासनाच्या हमीवर पहिल्या टप्प्यात पाच साखर कारखान्यांना ५९४ कोटी ७६ लाख रुपयास मंजुरी मिळाली; पण रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरूर यांनी राज्य शासनाच्या हमीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर, सुनावणी होऊन न्यायालयाने पाच कारखान्यांना दिलेल्या ५९४ कोटी ७६ लाखांपैकी १०७ कोटी ६९ लाख रुपये राखीव ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाच कारखान्यांची सम प्रमाणात रक्कम राखीव ठेवून उर्वरित रक्कम संबंधितांना वाटप करण्यात आली आहे.

असे मिळणार कारखान्यांना मार्जिन मनी लोन

कारखानामार्जिन मनी लोन रक्कमराखून ठेवलेली रक्कम
विश्वासराव नाईक, चिखली सांगली६५ कोटी११.७० कोटी
नागनाथ नायकवडी, हुतात्मा वाळवा१४८.९० कोटी२७.५६ कोटी
अशोक, श्रीरामपूर अहमदनगर९०.३० कोटी१६.२५ कोटी
विठ्ठल, वेणूनगर पंढरपूर२६७.५९ कोटी४८.०५ कोटी
शेतकरी, किल्लारी औसा, लातूर२२.९७ कोटी४.१३ कोटी

कर्जाच्या परतफेडीचा कालावधी आठ वर्षेसाखर कारखान्यांना दिलेले कर्ज परतफेडीचा कालावधी आठ वर्षे राहणार आहे. सुरुवातीची दोन वर्षे विलंब कालावधी असेल; मात्र या कालावधीत व्याजाची रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुद्दल व व्याजाची वार्षिक समान सहा हप्त्यात (हंगाम २०२६-२७ ते २०३१-३२ पर्यंत) परतफेड करायची आहे.

अधिक वाचा: Loan for Sugar Factories in Maharashtra : कर्ज परतफेडीच्या जबाबदारीने कारखान्याचे संचालक धास्तावले

टॅग्स :साखर कारखानेऊसमहाराष्ट्रउच्च न्यायालयसरकारराज्य सरकार