Lokmat Agro >शेतशिवार > नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

11 thousand farmers of this district who pay regular loan will get incentive subsidy | नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळालेले आहे. अनुदानापोटी शेतकऱ्यांना सुमारे ४६ कोटी रुपये मिळणार आहेत.

योजनेत पात्र होण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्ज उचल करून नियमितपणे मुदतीत परतफेड करणे सक्तीचे होते. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी या तीनपैकी एकाच वर्षात दोन हंगामांची पीक कर्ज उचल करून परतफेड केलेल्या १४ हजार ४०० शेतकरी लाभापासून वंचित राहत होते.

तांत्रिक अडचणीमुळे हे शेतकरी वंचित राहणार असल्याचा मुद्दा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासन दरबारी लावून धरला. जिल्हा बँकेच्या मागील सर्वसाधारण सभेत तसा ठराव करून बँकेनेही पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन महिन्यांपूर्वी अनुदान मंजूर झाले, पण सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी रकमा तातडीने वर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पात्र शेतकरी व रक्कम
तालुका - शेतकरी - रक्कम
आजरा - ३६४ - १.३३ कोटी
भुदरगड - ५६४ - १.९२ कोटी
चंदगड - ३९९ - ३.९९ कोटी
गडहिंग्लज - ५०८ - २.०३ कोटी
गगनबावडा - २८७ - १.२१ कोटी
हातकणंगले - १३१३ - ५.२५ कोटी
करवीर पूर्व - १९०९ - ३.९२ कोटी
करवीर पश्चिम - २२९२ - ७.९८ कोटी
कागल - १०८६ - ४.१९ कोटी
पन्हाळा - १३९३ - ५.१६ कोटी
राधानगरी - ९१० - २.८३ कोटी
शाहूवाडी - ३२० - १.२९ कोटी
शिरोळ - १७४३ - ७.५७ कोटी

Web Title: 11 thousand farmers of this district who pay regular loan will get incentive subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.