यंदा खरिपाच्या लागवडीसह आंबा, चिकू, सीताफळ, काजू, केळी, नारळ यासह सोनचाफा, मोगरा, चंदन फूलशेतीची लागवड तब्बल एक हजार ३१४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील या फळबाग लागवडीत ठाणे जिल्हा राज्यात अव्वल आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी आयुक्तालय, फलोत्पादन संचालक डॉ. के. पी. मोते यांनी ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार दीपक कुटे यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम यंदा राज्यात हाती घेण्यात आला. या २०२३-२४ च्या कार्यक्रमाचा राज्यस्तरीय आढावा अलीकडेच संचालकांनी घेतला. त्यात ठाणे जिल्ह्याने एक हजार ५०० हेक्टरच्या लक्षांकापैकी आतापर्यंत एक हजार ३१४ हेक्टरवर फळबाग लागवडीसह फूलशेतीची काम पूर्ण केले. या उल्लेखनीय कामाची दखल घेत राज्याच्या संचालकांनी घेतली.
फळांची इतक्या एकरात झाली लागवड
फळबाग, फूलशेतीकडे वळलेल्या दोन हजार ५१२ शेतकऱ्यांपैकी एक हजार ९५४ शेतकऱ्यांनी त्यांच्या एक हजार ३१४ हेक्टर जमिनीवर लागवड पूर्ण केली. यामध्ये सर्वाधिक आंब्याच्या बागा एक हजार १६३ हेक्टरवर आहेत. मंत्रळी शेतकऱ्यांना फळबागांसह चाफा, आहेत.
पोफळी, मोगरा आदी फूलशेतीकडे वळण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून कृषी विभागाने झपाटल्यागत काम करून लक्षांकाच्या ८६.६६ टक्के काम पूर्ण केले. ४५ ते ५० हेक्टरवर चाफा, मोगरा, चंदनाची फूलशेती केली जात आहे. यामध्ये मोगरा १३.२५ हेक्टर, सोनचाफा २८.३२ हेक्टर, चंदनाची शेती दीड हेक्टरवर होत आहे.