Lokmat Agro >शेतशिवार > १४ कृषी सहायकांवर गुन्हा, अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ भोवली

१४ कृषी सहायकांवर गुन्हा, अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ भोवली

14 Offenses against agricultural assistants | १४ कृषी सहायकांवर गुन्हा, अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ भोवली

१४ कृषी सहायकांवर गुन्हा, अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ भोवली

अतिवृष्टीमुळे पिकांचे यांच्यावर दाखल झाला गुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या ...

अतिवृष्टीमुळे पिकांचे यांच्यावर दाखल झाला गुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या ...

शेअर :

Join us
Join usNext

अतिवृष्टीमुळे पिकांचे यांच्यावर दाखल झाला गुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या जालना तालुक्यातील १४ गावांतील कृषी सहायकांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

२०२२ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली होती. त्यानुसार कृषी सहायकांना शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार क्रमांक व अन्य माहिती असलेल्या याद्या तयार करून शासनाच्या पोर्टलवरील विहित वेळेत अपलोड करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाने दिले होते. यासंदर्भात जून व जुलै महिन्यात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत वारंवार झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जालना तालुक्यातील १४ कृषी सहायकांनी १५ गावांमधील शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या नसल्याचे समोर आले. या महसूल प्रशासनाने नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांना शिस्तभंगाच्या कार्यवाहीची नोटीस दिली होती. त्यानंतरही संबंधित कृषी सहायकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्याच नाहीत. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानंतर नायब तहसीलदार दिलीप शेणफळ सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात 14 कृषी सहाय्यकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे करीत आहेत.

"विहित मुदतीत शेतकन्यांना अनुदानाचे वाटप करायचे असल्याने तालुक्यातील १० गावे प्रत्येकी एकप्रमाणे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना वाटून देण्यात आले होते; परंतु त्यांनी ७५ गावांचीच यादी दाखल केलेली होती. वारंवार नोटीस देऊनही याद्या दाखल न करणाऱ्या १५ गावच्या १४ कृषी सहायकांवर तहसीलदारांनी प्राधिकृत केल्यानुसार पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे."
-दिलीप सोनवणे, नायब तहसीलदार, जालना


यांच्यावर दाखल झाला गुन्हा-

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या कृषी सहायकांमध्ये एम. एस. घोरपडे (हिस्वन बु.), ए. एन. सोनवलकर (चितळीपुतळी), व्ही. के. पुंड (रेवगाव), जी. एल. ढवळे (वडीवाडी, ममदाबाद), एस. एस. काकडे (नागापूर), जे. के. तायडे (उमरी), बी. जे. कदम (पळसखेडा), एन. जी. राठोड (कवठा), यु. बी. बंगाळे (माळेगाव खु.), यु. डी. खांडेभराड (थार), जी. ए. अंभोरे (खणेपुरी), व्ही. आर. कुलकर्णी (तांदुळवाडी बु.), एस. के. भुतेकर (रायगव्हाण), बी. एल. वाघ (अंबेडकरवाडी) यांचा समावेश आहे.
 

Web Title: 14 Offenses against agricultural assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.