देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जमा झाला आहे. राजस्थान मधील सिकर येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन समारंभातून या हप्त्याचे वितरण केले.
राजस्थानातून तसेच देशभरातून प्रत्यक्ष व आभासी स्वरूपात शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित राहिले. देशात सव्वा लाख पीएम किसान केंद्रांची स्थापना करण्यात आली. तसेच ' ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) यावर 1,600 शेतकरी उत्पादक संघटनांना (FPO) जोडले गेले आहे. FPO उपक्रम फेब्रुवारी 2020 मध्ये 6,865 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह, पुढच्या 5 वर्षांमध्ये 10,000 नवीन FPO स्थापन करण्याचा संकल्प करत सुरु करण्यात आला.
"ही पीएम किसान केंद्र शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग दाखवणारे असतील. शेतकऱ्यांना शेती निगडित कामांसाठी लागणाऱ्या गरजांसाठी खतांपासून अवजारापर्यंत सारे काही या केंद्रांवरून मधून शेतकऱ्याला मिळेल"- पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
पीएम किसान सन्मानंद निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चपर्यंत पाठविला जातो.
कशी कराल तक्रार?
पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयी शेतकऱ्यांना करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल. पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 1800115526614वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606