Join us

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? असे तपासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 2:06 PM

पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.  

आजतागायत शेतकऱ्यांना या योजनेचे एकूण १४ हप्ते मिळाले असून आता १५ व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र १५ वा हप्ता तुमच्या खात्यावर येणार की नाही हे तपासणे आवश्यक आहे. 

त्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा.१. १५व्या हप्त्याचा लाभ मिळेल की नाही? यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेटसमधील मेसेज तपासावा लागेल.२. तो तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत शेतकरी पोर्टल pmkisan.gov.in वर लॉग इन व्हावे लागेल..३. वेबसाइटवर  तुम्हाला 'बेनिफिशियरी स्टेटस’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.४. यानंतर तुमचा योजनेचा नोंदणी क्रमांक किंवा दहा अंकी मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.५. आता तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल, तो भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे स्टेटस‌् तुम्हाला दिसेल.६. तुमच्या स्टेटस‌्च्या समोर ई-केवायसी, पात्रता आणि लँड सीडिंग च्या समोर लिहिलेला एक मेसेज दिसेल. ७. या तिघांच्या पुढे ‘यस’ लिहिलेले असल्यास तुम्हाला १५व्या हप्त्याचा लाभ मिळेल, पण नाही लिहिले असल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यासाठी पुन्हा ई-केवायसी करावी लागेल.

ई-केवायसी कशी करतातhttps://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.आता किसान कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.त्यानंतर येथे विचारलेली आवश्यक माहिती प्रविष्ट करा.यानंतर सबमिट वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण होईल.

याप्रमाणे तुमची स्थिती तपासासर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.आता ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.शेतकरी या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीसरकारी योजनाशेती