बालाजी आडसूळ
यंदाच्या (२०२४-२५) गाळप हंगामाच्या फडात राज्यातील १८६ साखर कारखान्यांत ऊसाचे 'क्रशींग' सुरु आहे. या कारखान्यांनी १८ डिसेंबरअखेर २३३.६७ लाख टन उसाचे गाळप करून १९.२६ लाख टन साखर उत्पादित केली आहे.
संपूर्ण गाळप हंगामात उपरोक्त कारखान्यातून १०० ते १०२ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात 'विस्मा'ने वर्तवला आहे.
यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील २४ सहकारी तर ९२ खासगी, अशा एकूण १८६ साखर कारखान्यांनी 'क्रशींग' सुरू केले आहे. जास्तीत जास्त गाळप करण्यावर सर्वच कारखान्यांकडून भर देण्यात आला आहे. १८ डिसेंबरअखेर २३३.६७ लाख टन उसाचे गाळप या कारखान्यांकडून करण्यात आले आहे.
या माध्यमातून १९.२६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असल्याचे विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी 'लोकमत'ला सांगितले.
दरम्यान, ऊस गाळपाची गती अशीच राहिल्यास संपूर्ण हंगामात किमान १०० ते १०२ लाख टन साखर उत्पादित होईल, याशिवाय यापैकी १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाऊन साखरेचे निव्वळ उत्पादन ९० लाख टन राहिल, असा 'विस्मा'चा अंदाज आहे.
तोट्यात विक्री, एमएसपीत वाढ हवी
सध्याचे स्थानिक बाजारपेठेतील साखरेचे दर किमान व कमालच्या मयदित विचंटलला दोनशे रुपयांनी कमी आहेत. यामुळे उत्पादन खर्चाच्या कमी किमतीत साखर विक्री करावी लागत आहे. उत्पादन खचर्पेिक्षा कमी उत्पन्न मिळत असल्याने केंद्राने साखरेची किमान विली किंमत अर्थात 'एमएसपी किमान ४१ रुपये प्रतिकिलो करावी, अशी मागणी विस्माचे अध्यक्ष बी, ची, ठोंबरे यांनी फेली आहे.
गाळपात पुणे अग्रेसर
विस्माने दिलेल्या विभागनिहाय माहितीनुसार ९.६८ टक्के उतारा राखत कोल्हापूर साखर उताऱ्यात अग्रेसर आहे, तर सर्वात कमी उतारा नागपूर विभागाचा आहे. एकूण गाळपात ५९.६६ लाख टन गाळप करीत पुणे विभाग अग्रस्थानी, तर ५३.१९ लाख टन गाळप करत कोल्हापूर दुसऱ्या स्थानावर आहे.
चिंता वाढवणारा प्राधान्यक्रम
ऊस एफआरपी व इथेनॉलच्या उत्पादन खर्चातील वाढ पाहता साखर, रस, बी-हेवी, सी-हेवी यांपासून उत्पादित इथेनॉल खरेदी दर प्रतिलिटर ३ ते ५ रुपयांनी वाढवावा, तसेच ताज्या खरेदी निविदेत घातलेली सहकारी प्रथम, खासगीला तिसरा 'प्राधान्यक्रम ही अट उद्योगावरचे एक संकट असल्याने सरकारचे लक्ष वेधले जाईल, असे विस्माचे अध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले,