Lokmat Agro >शेतशिवार > कोकणात दरवर्षी १८.६३ कोटी नारळ उत्पादन

कोकणात दरवर्षी १८.६३ कोटी नारळ उत्पादन

18.63 crore coconuts produced annually in Konkan | कोकणात दरवर्षी १८.६३ कोटी नारळ उत्पादन

कोकणात दरवर्षी १८.६३ कोटी नारळ उत्पादन

जागतिक नारळ दिन विशेष: महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, १,४५७ लाख नारळाचे उत्पादन घेतले जाते. तर रत्नागिरी जिल्ह्यातून ४०६ लाख उत्पादन मिळते.

जागतिक नारळ दिन विशेष: महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, १,४५७ लाख नारळाचे उत्पादन घेतले जाते. तर रत्नागिरी जिल्ह्यातून ४०६ लाख उत्पादन मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण आडिवरेकर
कोणत्याही कार्यक्रमात अथवा जेवणात वापरल्या जाणाऱ्या नारळाचे महाराष्ट्रात लागवडीचे एकूण क्षेत्र ४३,१६० हेक्टर इतके आहे. त्यातून २२.३६ लाख इतके उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, १,४५७ लाख नारळाचे उत्पादन घेतले जाते. तर रत्नागिरी जिल्ह्यातून ४०६ लाख उत्पादन मिळते. दोन जिल्ह्यात मिळून एकूण १८ कोटी ६३ लाख इतके उत्पादन घेतले जात आहे. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषीविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी याबाबत माहिती दिली.

जगात ९३ देश उत्पादन घेत आहेत जगातील नारळाचे क्षेत्र १२२ लाख हेक्टर इतके असून, त्यातून ६५,६७१ लाख इतके उत्पादन मिळत आहे. देशात दरवर्षी ६,०७४ कोटी रुपये परकीय चलन नारळ उद्योगातून मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे एकूण क्षेत्र १७,९२९ हेक्टर इतके आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात हे क्षेत्र ५,६५६ हेक्टर इतके आहे. 

नारळ पिकाच्या उन्नतीसाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये येथे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे केंद्र पीक सुधार, उत्पादन, तंत्रज्ञान यामध्ये सन १९५५ पासून काम करत आहे. या केंद्राने अधिक उत्पादन देणारी 'प्रताप' ही जात निर्माण केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप ऑर्डिनरी', ' फिलीपाइन्स ऑर्डिनरी' या जाती, तसेच टीxडी व डीटी या संकरित जातींची ही शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक जातीपेक्षा प्रतिमाड ४० ते ५० नारळाचे जादा उत्पादन मिळत आहे, अशी माहिती डॉ. मालशे यांनी दिली.

ईरिओफाइड माईट नियंत्रणासाठी संशोधन
नारळावरील गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, काळ्या डोक्याची अळी आणि कोंब कुजणे, रोग यांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या ईरिओफाइड माईट रोगाच्या नियंत्रणासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. लवकरच त्यात यश येईल.

नारळ दिनाचा उद्देश
-
आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती.
- नारळ उत्पादकता वाढविणे.
- नारळ पिकाचा क्षेत्र विस्तार करणे.
- नारळावरील उत्पादन खर्च कमी करणे.
- नारळावर आधारित एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे.
- नारळापासून मूल्यवर्धित पदार्थ आणि उपपदार्थाची निर्मिती करणे.
- नारळ शेतीमध्ये उद्यमशीलता विकसित करणे.
- पडिक क्षेत्र लागवडीखाली येण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.

अधिक वाचाजागतिक नारळ दिन, कल्पतरू बद्दल विशेष माहिती

लागवडीची पंचसूत्री
योग्य जातीची निवड.
- योग्य अंतरावर नारळ लागवड.
- योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन
योग्य आंतर पिकांची लागवड.
योग्य प्रकारे कीड आणि रोगाचे व्यवस्थापन.

Web Title: 18.63 crore coconuts produced annually in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.