Join us

धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार, मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय झाले निर्णय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 26, 2024 9:08 AM

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Cabinet Meeting Maharashtra: आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत आहे. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कमधान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल.

हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याच निर्णय घेण्यात आला. यासाठी 15 कोटी 48 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मान्यता

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जामशेत लघु पाटबंधारे योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. गिरणा नदीच्या खोऱ्यात जामशेत नाल्यावर ही योजना असून प्रस्तावित धरण स्थळ कळवण पासून 20 कि.मी. अंतरावर आहे.  या योजनेत 1 हजार 30 सघमी पाणी साठा व 227 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.

जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना

जुने टान्सफॉर्मर्स (रोहित्रे) बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 1600 कोटी रुपये खर्च लागणार असून त्यापैकी 2023-24 मध्ये 200 कोटी, 2024-25 मध्ये 480 कोटी आणि 2025-2026 मध्ये 480 कोटी अशा खर्चास मंजुरी देण्यात आली.  टान्सफॉर्मर्सचे ऑईल बदलण्यासाठी देखील 340 कोटीस मान्यता देण्यात आली.

टॅग्स :एकनाथ शिंदेशेतकरीमहाराष्ट्र