राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार.
तसेच उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. त्यानुषंगाने सन २०२०, २०२१ व २०२२ करीता विविध कृषि पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करण्यात येतो.
सन २०२०, २०२१ व २०२२ करिताचे कृषि पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थीची नांवे निश्चित करण्याकरिता मा. मंत्री (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन २०२०, २०२१ व २०२२ करिताच्या कृषि पुरस्कारांकरिता खाली दिलेल्या लिंकवर वर्षनिहाय विवरणपत्र-२०२०, विवरणपत्र-२०२१ व विवरणपत्र-२०२२ मध्ये नमूद केल्यानुसार व्यक्ती/संस्था यांची नावे निश्चित करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
पुरस्कारार्थींची यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://shorturl.at/eLNS3