Join us

१ लाख ४८ हजार ३६८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २०६ कोटीचे होणार वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:31 AM

गतवर्षाच्या शेवटी अवकाळीमुळे जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरिपासह रच्ची हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली आऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला होता.

जयेश निरपळ

गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आहीर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या १ लाख ४८ हजार ३६८ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी मंजूर झालेला २०६ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून, याचा जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार १९४ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

गतवर्षाच्या शेवटी अवकाळीमुळे जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरिपासह रच्ची हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली आऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पंचनामे करून मदतीची मागणी केली होती, त्यानुसार जिल्ह्यात पंचनामे करण्यात आले होते. त्यात २ लाख ६४ हजार १९४ शेतक-यांचे १ लाख ४८ हजार ३६८.४१ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. यासाठी २० जानेवारी रोजी २०६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार शासनाने १ जानेवारी २०२४ च्या नवीन निर्णयानुसार सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार राज्यभरासाठी २ हजार १०९ कोटी १२ लाख २ हजार रुपयांचा निधी ३१ जानेवारी रोजी मंजूर करण्यात आला होता त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात होती.

आता शासनाच्या नवीन निकषानुसार जिरायत, बागायत व फळपिकांच्या नुकसाभरपाईपोटी अनुक्रमे १३ हजार ६०० रुपये, २७ हजार रुपये व ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसानभरपाई मिळणार आहे.चार मित्रांची उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड  

गंगापूर तालुक्यास सर्वाधिक निधी जिल्ह्यासाठी मंजर २०४ कोटी

जिल्हयासाठी मंजूर २०६ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक ७४ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा निधी गंगापूर तालुक्याच्या वाट्याला आला असून, याचा तालुक्यातील ७६ हजार ४३७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, तर कन्नड तालुक्यातील १२ हजार ६४ शेतकऱ्यांना ६३ कोटी ७६ लाख ४६ हजार ४०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यात कन्नडच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

चार प्रक्रियेनंतर अनुदान बळीराजाच्या खात्यावर

• निधी मंजुरीच्या आदेशानंतर अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या याचा प्रत्येक तालुका प्रशासनाकडून अपलोड केल्या जातात, त्यांनतर शेतकर्‍यास एक विशिष्ट क्रमांक मिळतो.

• तेव्हा शेतकयांनी ई - केवायसी करून घ्यावी लागते. त्यांनतर पंधरा ते वीस दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्याच्या स्वात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा होते.

तालुकानिहाय मंजूर निधी अन् शेतकरी

तालुक्याचे नावबाधित शेतकरीबा.क्षेत्र हे.मंजूर निधी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण१५७१२५.२१४३४५५६०
गांगपूर७६७३७५४८५४७४७४८८४००
खुलताबाद३१९२९१८०६०२६५११३४००
कन्नड ९२०६४४६८६६६३७६४६४००
सिल्लोड६१८४०२७५५४३७४७३४४००
सोयगाव १७६७९०९.२०३०७३००००
एकूण२६४१९४१४८३६८.४१२०६००५८१६०

 

पैठण, फुलंब्री, वैजापूर, छ. संभाजीनगर शहर या तालुक्यांना निधी मंजूर नाही.

गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ५६१ शेतकयांना राज्य शासनाने ७०९ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 

टॅग्स :पाऊसदुष्काळगारपीटऔरंगाबाद