Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील २१ कारखान्यांना सरकारची कर्जासाठी थकहमी

राज्यातील २१ कारखान्यांना सरकारची कर्जासाठी थकहमी

21 factories in the state are guaranteed loan defaults by the government | राज्यातील २१ कारखान्यांना सरकारची कर्जासाठी थकहमी

राज्यातील २१ कारखान्यांना सरकारची कर्जासाठी थकहमी

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कर्ज देणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कर्ज देणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कर्ज देणार आहे.

याची रक्कम अद्याप निश्चित झाली नसली तरी राजकीय नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मेहेरबान झाले आहे. या २१ कारखान्यांपैकी १५ कारखाने सत्ताधाऱ्यांच्या गटातील आहेत, हे विशेष. तर उर्वरित ६ कारखान्यांमध्ये दोन शरद पवार, १ काँग्रेस, दोन अपक्ष व एक राजकीय संबंध नसलेला कारखाना आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित दोन नेते, अजित पवार यांच्याशी संबंधित पाच नेते तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा समावेश आहे. राज्याने एनसीडीसीकडून कर्जासाठी शिफारस केलेल्या कारखान्यांमध्ये विनय कोरे (अपक्ष आमदार) यांचा कोल्हापूरमधील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी अजित पवार) यांचा लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होईल आता वेळेत; केंद्राने घेतला हा मोठा निर्णय

तसेच मंत्री संदीपान भुमरे (शिंदेसेना) यांचा छत्रपती संभाजीनगर येथील श्री रेणुका शरद सहकारी साखर कारखाना, तसेच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार मकरंद जाधव पाटील यांच्या सातारा येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे दोन युनिट तसेच धाराशिवमधील काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांचा श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

विरोधकांमध्ये शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा (राष्ट्रवादी-शरद पवार) रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक यांचा विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा रायगड सहकारी साखर कारखाना, उद्धवसेनेचे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री यशवंतराव गडाख यांचा मुळा कारखाना यांचाही समावेश आहे. राजेंद्र नागवडे यांचा सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे एसएसके, सोलापूरमधील धर्मराज काडादी यांचा श्री सिद्धेश्वर यांच्या कारखान्याचाही यात समावेश आहे.

Web Title: 21 factories in the state are guaranteed loan defaults by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.