Lokmat Agro >शेतशिवार > मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या योजनांसाठी २३ लाख रूपये निधी, कुठे कराल अर्ज?

मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या योजनांसाठी २३ लाख रूपये निधी, कुठे कराल अर्ज?

23 lakh rupees fund for schemes of backward class farmers, where to apply? | मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या योजनांसाठी २३ लाख रूपये निधी, कुठे कराल अर्ज?

मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या योजनांसाठी २३ लाख रूपये निधी, कुठे कराल अर्ज?

शेतकरी अभ्यास दौरा, शेडनेट हाऊससह वैयक्तिक लाभ योजना

शेतकरी अभ्यास दौरा, शेडनेट हाऊससह वैयक्तिक लाभ योजना

शेअर :

Join us
Join usNext

एकात्मिक फलोत्पादन विकास - अभियान सन २०२३-२४ अंतर्गत फुलपिक लागवड, मशरुम उत्पादन, हरीतगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, टॅक्टर, २० एचपी, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, - कांदाचाळ, पॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकांसाठी - अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २३ लाख - रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी - ३ लाख रुपये निधी प्राप्त झालेला आहे.

याबाबींचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी - अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे. अर्जासाठी महा-महाडीबीटीचे https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login किंवा मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या योजनांसाठी २३ लाख रूपये आणि अनुसूचित जमातीसाठी ३ लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे.

https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लाडके यांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची सोय; कृषीचे आवाहन
मागासवर्गीय शेतकऱ्यांना मदत व्हावी, त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या हेतूने कृषी विभाग अंतर्गत एकात्मिक उत्पादन विकास योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी शासनाकडून मदत करण्यात येत आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात यावा, अशा आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संग्राम केंद्रातही लाभ घेता येणार आहे. 

Web Title: 23 lakh rupees fund for schemes of backward class farmers, where to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.