Lokmat Agro >शेतशिवार > अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या २३.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या २३.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

23.90 lakh farmers who have lost their crops due to bad weather will get compensation | अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या २३.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या २३.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे भाभी कोटी भा रुपयांची भरपाईची मागणी केली आहे.

नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे भाभी कोटी भा रुपयांची भरपाईची मागणी केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नितीन चौधरी
पुणे : नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे भाभी कोटी भा रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सुमारे २४ लाख शेतकऱ्यांना फटका
- अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटूनही पिकांचे पंचनामे रखडले होते. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला.
- राज्यातील २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालानुसार १३७९ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

अकोल्यात सर्वाधिक नुकसान
अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला असून, येथील १ लाख ८८ हजार ४२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या खालोखाल अमरावती जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६९६ हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १८१ क्षेत्र बाधित झाले. सर्वाधिक २ लाख ९७ हजार ९७२ बाधित शेतकरी अमरावती जिल्ह्यातील आहेत. बुलढाणा २ लाख ७६ हजार ५७५ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाख ६३ हजार ९६४ शेतकऱ्यांना फटका बसला. आर्थिक मदतीचा विचार करता सर्वाधिक २०८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत अकोला, तर अमरावतीला २०६ कोटी ३३ लाख रुपये नुकसानीपोटी मिळतील. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत.

अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मदत लवकर जाहीर झाल्यास त्वरेने शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल. - दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, पुणे

Web Title: 23.90 lakh farmers who have lost their crops due to bad weather will get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.