राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे.
सारंगखेडा यात्रेत यंदा विक्रमी अर्थात दोन हजार ७०० घोडे विक्रीला आले आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, बिहार, यासह विविध राज्यातील घोडे विक्रीसाठी आले आहेत. त्यातील बहतांश घोड्यांनी अश्व स्पर्धेत सहभाग घेऊन बाजी मारली. सोमवारअखेर या यात्रेत एकूण ६९७ घोड्यांची विक्री झाली असून, त्यातून दोन कोटी ९६ लाख ८८ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
अधिक वाचा: दीड टनाचा हिंद केसरी गजेंद्र पाहिलाय?
जवळपास ६० पेक्षा अधिक घोडे एक लाखाहून अधिक किमतीत विक्री झाले आहेत. ही यात्रा ९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, त्यामुळे यंदाची उलाढाल गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.