Join us

केवायसी न केल्याचा फटका; 30 हजार शेतकरी 'नमो शेतकरी' ला मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 4:00 PM

३ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड

केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी २ हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र यासोबतच जिल्ह्यातील २९ हजार ६८९ शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांचा हप्ता गोठविला जाणार असून ते या महासन्मान लाभापासून वंचित राहणार आहेत.

केवायसी पूर्ण करावी

शेतकयांनी पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी केवायसी तथा आधार सिडिंग करणे गरजेचे खुलताबाद आहे. ज्यांचे केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांना महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या शेतकयांचे आधार सिडिंग व केवायसी बाकी असेल, त्या शेतकऱ्यांनी ते त्वरित पूर्ण करून घ्यावे. - बी. जे. जायभाये, तालुका कृषी अधिकारी, गंगापूर

१० ऑक्टोबरपर्यंत केवायसी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरासह शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मिळून ३ लाख ६८ हजार २१५ शेतकऱ्यांपैकी १३ ऑक्टोंबरपर्यंत ३ लाख ३८ हजार ५२६ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे.तर अद्याप २९ हजार ६८९ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांचा सन्मान निधीचा हप्ता गोठविण्यात झाला आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात येत आहे.असे झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 

नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पहिल्या हप्त्यापोटी १ हजार ७२० कोटी रुपये इतका निधी शासनाकडून कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीकरता पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी पूर्वी केंद्राचा पंधरावा हप्ता जमा करण्यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रशेती