Lokmat Agro >शेतशिवार > दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी

दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी

3,000 crore needed for drought relief | दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी

दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी

मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे मंडलनिहाय निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून मंडलनिहाय दुष्काळ ठरविण्याचे निकष या बैठकीत ठरविण्यात येणार आहेत.

मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे मंडलनिहाय निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून मंडलनिहाय दुष्काळ ठरविण्याचे निकष या बैठकीत ठरविण्यात येणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कमी पर्जन्यमानामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सरकारकडून केंद्राच्या निकषांनुसार ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. या तालुक्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींची मदत मागितली जाणार आहे.

बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तीन हजार कोटींचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा विभाग तसेच कर्जाचे पुनर्गठन या स्तरांवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

उर्वरित तालुक्यांत काय?
मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे मंडलनिहाय निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून मंडलनिहाय दुष्काळ ठरविण्याचे निकष या बैठकीत ठरविण्यात येणार आहेत. ५०० मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

Web Title: 3,000 crore needed for drought relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.