Join us

३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 1:14 PM

आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार लाभ

विदर्भ आणि मराठवाडभातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्हाांमध्धील दारिद्रयरेषेवरील (एपीएल- केशरी रेशन कार्डधारक) शेतकन्यांना रेशनसाठी दरमहा १५० रुपयांऐवजी आता १७० रुपये बैंक खात्यात टाकण्यात येणार आहेत. ८ लाख कार्डधारकांना म्हणजे एकूण ३२ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

अन्य शेतकऱ्यांप्रमाणे याही शेतकऱ्यांना पूर्वी तीन रुपये किलो तांदूळ, तर दोन रुपये दराने गहू दिला जात असे. मात्र, या योजनेत गहू, तांदूळ पुरवता येणार नाही, असे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला कळविले.

त्यामुळे १४ जिल्ह्यांमधील केशरी कार्डधारक शेतकन्यांना रेशन खरेदीसाठी दरमहा १७० रुपये देण्याची योजना २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. आता त्यात प्रत्येक लाभार्थीमागे २० रुपयांची वाढ करून ही रक्कम १७० रुपये करण्यात आली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

वर्षाकाठी ६५२ कोटींचा अतिरिक्त भार

एका कुटुंबात किमान चार लाभार्थी असतात हे लक्षात घेता आठ लाख कार्डधारकांच्या कुटुंबांतील ३२ लाख जणांना अधिकची रक्कम मिळेल, या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आधी महिन्याकाठी ४८ कोटी, तर वर्षांकाठी ५७६ कोटी रुपयांचा खर्च यायचा. आता महिन्याकाठी ५४.४० कोटी आणि वर्षाकाठी ६५२ कोटी ८० लाख रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.

हेही वाचा - शेतशिवरात आढळणाऱ्या बहुपयोगी पळसाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :शेतकरीग्रामीण विकासशेतीशेती क्षेत्रसरकार