Lokmat Agro >शेतशिवार > ओव्हरफ्लो झालेल्या अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर

ओव्हरफ्लो झालेल्या अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर

32.42 crore sanctioned for strengthening of overflowed Ambazari Lake | ओव्हरफ्लो झालेल्या अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर

ओव्हरफ्लो झालेल्या अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर

नागपूरमध्ये झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे होणार दुरुस्ती...

नागपूरमध्ये झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे होणार दुरुस्ती...

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर शहरातील अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ढगसदृश्य पावसाने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. परिणामी, सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भविष्यात अतिवृष्टीचा त्रास होऊ नये यासाठी शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी अवघ्या ४ तासांत ११२ मि.मी. पाऊस झाला होता. अतिवृष्टी आणि पूरामुळे नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाले हाते. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी शिरून पीकांची नासाडी झाली. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यावेळी तातडीची मदत देण्यात आली.मात्र, नागनदी, पिवळी नदीच्या भिंती फुटल्या. हा पाऊस इतक्या वर्षात पहिल्यांदाच झाला असला तरी बदलत्या हवामान बदलांमुळे व टोकांच्या बदलामुळे अशी परिस्थिती भविष्यातही येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जूनी धरणे तसेच अबाझरी धरणाच्या बळकटीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

अंबाझरी धरणाची काय दुरूस्ती होणार?

दीडशे वर्ष जुने धरण असलेल्या अंबाझरी धरणाचे बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात जीर्ण भींतींचे काँक्रिटीकरण आणि सुरक्षिततेसाठी 21.07 कोटी, तर माती धरण दुरुस्ती, दगडी पिचिंग, खाली एक ड्रेन इत्यादी कामांसाठी 11.35 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने राज्य सरकारकडे 234.21 कोटी रुपयांचा एक प्रकल्प अहवाल सादर केला असून, क्षतिग्रस्त नदी, नाले बांधकाम, पूल, रस्त्यांचे काम आदी कामे तातडीने हाती घेण्यात येतील. अंबाझरी ते पंचशील चौकापर्यंत सुमारे 5 कि.मी.चे अंतर असलेल्या नदीचे खोलीकरण करण्यात येऊन त्यातून गाळ काढण्यात येईल, यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.

नासुप्रच्या स्केटिंग रिंग पार्किंगमुळे पाणी अडल्याची घटना सुद्धा घडली आहे. त्यामुळे हे पार्किंग मोकळे करुन तेथील प्रवाह सुरळीत होण्यासाठी पार्किंग पिल्लर काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हिंगणा एमआयडीसी हा अंबाझरीचा ग्राहक होऊ शकतो. त्यामुळे त्याचीही शक्यता पडताळून पाहण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 32.42 crore sanctioned for strengthening of overflowed Ambazari Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.