Join us

सोलापूर जिल्ह्यात ३८ कारखान्यांनी मागितली गाळपाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 10:34 AM

एकरी उसाचा उतारा कमी पडू लागल्याने कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. अशातच कारखाने बंद ठेवणेही परवडणारे नाही म्हणून ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले आहेत. तीन-चार कारखान्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत.

जिल्ह्यात उसाची कमतरता असताना तब्बल ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले, तर प्रत्यक्षात कारखाने सुरू होऊ लागल्याने उसाला चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ४० हजार हेक्टर उसाची नोंद असली, तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. याशिवाय पाऊस कमी व ऊस वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याने उसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. याचा फटका ऊस गाळपावर बसत आहे.

एकरी उसाचा उतारा कमी पडू लागल्याने कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. अशातच कारखाने बंद ठेवणेही परवडणारे नाही म्हणून ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले आहेत. तीन-चार कारखान्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. उसाची वाढ न झाल्याने शेतकरीही ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची थांबायची तयारी ठेवून आहेत. साखर कारखान्यांचे कर्मचारी ऊस उत्पादकांपर्यंत जात असले तरी ऊसतोडणीसाठी शेतकरी दराची विचारणा करीत आहेत. बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर कारखान्यांनेही २७०० रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यातील ऊस आता लगतच्या कमी दर देणाऱ्या कारखान्यांना मिळणे अशक्य आहे.

विभागातील ३१ कारखान्यांना परवानेसोलापूर प्रादेशिक साखर विभागातील सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांना सोमवारपर्यंत गाळप परवाने देण्यात आले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

..तरीही २७०० रुपये दिला दरमाळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्यांने सर्व प्रथम पहिली उचल २७०० रुपये जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या साखर कारखान्यांतून सध्या केवळ साखर तयार होते. इथेनॉल, वीज किंवा इतर उपपदार्थाची निर्मिती सध्या केली जात नाही. मात्र, पहिली उचल २७०० रुपये जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी २५०० रुपये दर शिवाय ऊस उत्पादकांना दिवाळीनिमित्त मोफत साखरही वाटप केली आहे.

सिद्धेश्वर साखर कारखान्याने २९०० रुपये दर जाहीर करून साखर उतारा चांगला पडला, तर आणखीन वाढ करण्याची तयारी ठेवल्याने इतर कारखान्यांची गोची झाली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याने २९०० रुपये जाहीर करताच लोकमंगलने भंडार कवठ्याच्या कारखान्यांचा दर २७०० रुपये केला आहे.

शेतकरी ऊस उत्पादकांनी साखर उतारा चांगला पडेल, असा ऊस पुरवठा करावा, शिवाय अधिक गाळप झाल्यास जाहीर केलेल्या २९०० रुपयांचाही विचार करता येईल, असे जाहीर आवाहन मी शेतकऱ्यांना केले आहे. साखर उतारा चांगला मिळाला तर दर वाढवून देण्याचा विचार करू. - धर्मराज काडादी, सिद्धेश्वर कारखाना

टॅग्स :साखर कारखानेऊससोलापूरशेतकरी