Join us

४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2023 8:30 PM

शेतकऱ्यांचा हिश्श्यातील सुमारे २५ कोटींची रक्कम शासनाने भरली

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात तब्बल चार लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी खरीपचा पीक विमा काढला आहे. ही योजना सुरू केल्यापासून आतापर्यंतच्या काळात एका हंगामात सर्वांत जास्त शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पीक विमा काढला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. मात्र, यावर्षी राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार खरीप हंगामातील पीक विम्याचा शेतकऱ्यांच्या हिश्श्यातील रक्कम शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. रक्कम निश्चित केली त्यामले यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ५० वातली आहे २०२३ २०२२ चार वर्षांत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ४१ हजार १ लाख ४८ हजार १ लाख ३८ हजार २०२१ २०२० ४ लाख ५३ हजार तसेच शेतकऱ्यांना पीक विमा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या हजार शेतकरी पीक विमा काढत होते. काढण्यासाठी केवळ एक रुपयाची संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

अंदाजे २५ कोटींची रक्कम भरली शासनाने

  • पीक विमा काढणाचा शेतकऱ्यांच्या विम्याच्या हिश्श्याची रक्कम शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातच शेतकयांच्या हिश्श्यातील २५ ते ३० कोटींची रक्कम राज्य शासनाने भरली आहे. 
  • हा विमा काढल्यामुळे आता खरीप हंगामात जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना विम्याच्या संरक्षणामुळे नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकणार आहे. जे शेतकरी विम्याची रक्कम भरु न शकल्यामुळे विमा काढत नव्हते, ते शेतकरीदेखील आता विम्याच्या संरक्षणात आले आहेत. 
  • दरम्यान, ही योजना खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी लागू राहणार असल्याने, आगामी रब्बी हंगामातदेखील पीक विमा काढणाऱ्या शेतकयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 
टॅग्स :पीक विमाशेतकरीपीकसरकारशेती