कोरोना काळापासून प्रत्येक जण आपल्यासोबतच कुटुंबाच्या आरोग्याबद्दल प्रचंड काळजी घेताना दिसत आहे. केंद्र सरकारने देखील अगदी कमीत कमी पैशात नागरिकांना विमा सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाचे हेल्थ कवच देण्यात येत आहेत.
जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना या महत्त्वाच्या विमा योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाखो नागरिकांना फायदा होताना दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यातील एक लाख ८१ हजार नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा तर ४ लाख ५६ हजार नागरिकांनी २० रुपयांत विमा सुरक्षा योजनेचा लाभ घेतले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेने दिलेल्या माहितीतून आकडेवारी समोर आली.
अल्प भू शेतकरी, नोकरदार, अशा सर्वांना या विमा योजनेचा लाभ घेता येतो हे विशेष.
काय आहे ? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
ही विमा पॉलिसी अतिशय माफक दरात असून, विमा पॉलिसी घेतलेल्या १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचा लाभ मिळतो.
काय आहे ? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
केवळ २० रुपयांत नागरिकांना विमा सुरक्षा कवच देण्यात येते. आजवर जिल्ह्यातील लाखो ग्राहकांनी ही विमा पॉलिसी खरेदी केली आहे. ग्राहकांना कमी बजेटची पॉलिसी वाटते.
'जीवन ज्योती'चे एक लाख ८१ हजार खातेदार; अनेकांना मिळाला विमा
अतिशय कमीत कमी पैशात नागरिकांना दोन लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा कवच मिळत आहे. आजपर्यंत शेकडो नागरिकांना याचा लाभ झाला आहे.
'सुरक्षा विमा'चे ४ लाख खातेदार; शेकडो जणांना विमा
केंद्र सरकारची ही अतिशय स्वस्तातील विमा पॉलिसी आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८१ हजार ग्राहकांनी पॉलिसी घेतली आहे, तर हजारो ग्राहकांना याचा लाभ मिळाला.
२० रुपयांत पॉलिसीला पसंती
प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना या केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण पॉलिसी आहेत. ग्राहकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना लाभ मिळाला - प्रेषित मोघे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक, जालना.