Join us

कृषी प्रदर्शनासाठी दिव्यांग शेतकऱ्याचा ४०० किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:48 PM

परभणी येथून गजानन कोडगीर हे शेतकरी एका पायाने अपंग असताना आणि चालता येत नसतानाही शेतीची आवड असल्याने शेती प्रदर्शन पाहण्यासाठी तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास करून आले आहेत.

पुणे : पुण्यातील मोशी येथील किसान प्रदर्शनामध्ये राज्यभरातून हजारो शेतकरी भेटी देण्यासाठी येत आहेत. आज या प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून १७ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे आज परभणी येथून गजानन कोडगीर हे शेतकरी एका पायाने अपंग असताना आणि चालता येत नसतानाही शेतीची आवड असल्याने शेती प्रदर्शन पाहण्यासाठी तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास करून आले आहेत. त्यांची शेतीबद्दलची ओढ आणि तळमळ शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

दरम्यान, किसान प्रदर्शनामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर विवध राज्यातूनही शेतकरी प्रदर्शनासाठी आले आहेत. परभणी येथून आलेले गजानन कोडगीर यांना शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी या प्रदर्शनाला यायचं ठरवलं होतं. त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील आणखी काही शेतकरी आले होते. तर चालता येत नसतानाही नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळेल आणि शेतीतील नव्या गोष्टी शिकायला मिळतील या हेतूने त्यांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे. 

कापूस पिकातून सर्वांत जास्त उत्पन्नगजानन कोडगीर यांच्याकडे १० एकर शेती असून सोयाबीन, कापूस अशा पिकांमधून ते चांगले उत्पन्न घेत असतात. कापसाच्या पिकातून सर्वांत जास्त नफा मिळतो असं त्यांनी सांगितलं. त्यांना चालता येत नसतानाही ते शेतातील काम करतात. तर आपल्या अपंगत्वामुळे खचून न जाता शेतीमध्ये इतर शेतकऱ्यांप्रमाणेच चांगले पीक घेतात. शेतीतील त्यांची निष्ठा आणि आवड शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

लोकमत अॅग्रोशी जोडण्याची संधीशेतकऱ्यांना सोप्या भाषेत माहिती, बातम्या देण्यासाठी लोकमत अॅग्रो कटिबद्ध आहे. किसान प्रदर्शनामध्ये लोकमतशी जोडण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार असून सरकारी योजना, ताज्या अपडेट, यशोगाथा, बाजारभावांची माहिती शेतकऱ्यांना लोकमत अॅग्रोच्या पेजवर पाहायला मिळणार आहे. पुढच्या तीन दिवसांत कधीही या प्रदर्शनाला भेट देऊन तुम्ही नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊ शकतात. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी