Join us

मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:00 PM

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

मराठवाड्यात सरत्या वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे ७६ पैकी ३८ शहरांवर फेब्रुवारी-मार्च २०२४ नंतर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होणार आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळविली आहे. बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

जून २०२४ पर्यंत १९ शहरांना तर ८ शहरांना जुलै २०२४ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. ६ शहरांना एप्रिल-मे अखेरपर्यंत, १२ शहरांना मार्च अखेरपर्यंतच पाणीपुरवठा होऊ शकेल. फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ शहरांना पाणी देता येणार आहे. तर ४ शहरांना जानेवारीअखेरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. दोन शहरांचे स्त्रोत आटले आहेत. ६ शहरांना येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होईल.

मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यातील सुमारे ७६ लाख लोकसंख्या शहरी भागात २०११ नुसार आहे. परंतु सध्या लोकसंख्या २ कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. शहरी लोकसंख्येचा टक्का ५० टक्के असणे, शक्य असून सुमारे १ कोटीहून अधिक लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या उन्हाळ्यात भेडसावेल.

जालना जिल्हा

जालना शहर सध्या पाणीसाठा

अंबड एप्रिल २०२४

परतूर मार्च २०२४

बदनापूर मार्च २०२४

घनसावंगी - फेब्रुवारी २०२४

जाफ्राबाद - फेब्रुवारी २०२४

फेब्रुवारी २०२४ मंठा

मार्च २०२४ तीर्थपुरी

परभणी जिल्हा

मानवत मार्च २०२४

पाथरी  फेब्रुवारी २०२४

सेलू  फेब्रुवारी २०२४

पालम - फेब्रुवारी २०२४

फेब्रुवारी २०२४ पूर्णा

फेब्रुवारी २०२४ सोनपेठ

जिंतूर - फेब्रुवारी २०२४

गंगाखेड फेब्रुवारी २०२४

हिंगोली जिल्हा

जुलै २०२४ हिंगोली

जुलै २०२४ वसमत

कळमनुरी -जून २०२४

औंढा नागनाथ जून २०२४

सेनगाव जून २०२४

टॅग्स :पाणी टंचाईपाणीपाणीकपात