Join us

या तालुक्यात ५०० ते ६०० एकरवर केली जाते निर्यातक्षम गुलाबाची शेती वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 1:16 PM

मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरवर फूल शेती पिकवली जात आहे. मुबलक पाणी असल्याने शेतकरी गुलाबाची फूल शेती करत असे, परंतु सध्याच्या युगात यांत्रिकीकरण आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर बंदिस्त फूल शेती करताना दिसत आहे.

मावळ तालुका हा कोकण भागाच्या घाटमाथ्यावर असल्यामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात पिकांचे उत्पादन घेत असे, परंतु आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी फूल शेती करू लागला आहे.

मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरवर फूल शेती पिकवली जात आहे. मुबलक पाणी असल्याने शेतकरी गुलाबाची फूल शेती करत असे, परंतु सध्याच्या युगात यांत्रिकीकरण आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर बंदिस्त फूल शेती करताना दिसत आहे.

यामधून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळत आहे. बंदिस्त फूल शेतीसाठी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जामध्ये सवलत मिळत असते. यामुळे मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा बंदिस्त फूल शेतीकडे कल वाढला आहे.

गुलाब, जरबेरा अशा विविध फुलांची जागतिक बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणावर असते. पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जात असतात.

याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती वेगळीच. तसेच, संपूर्ण जगभरातील तरुणाईंना उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डेच्या आठवड्यात गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतिक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या तयारीसाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची तीन महिनाभर आधी लगबग सुरू असते.

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने दरवर्षी व्हॅलेंटाइन 'डे'ला मावळातून ३० ते ३५ लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत असते.

या देशांत होते निर्यातमावळातील 'डच फ्लॉवर' प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्ळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राइक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉडजन, ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलाँस, या फुलांना दर्जामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई येथे मागणी आहे.

टॅग्स :फुलशेतीफुलंमावळपुणेपीकशेती