करकंब : पंढरपूर तालुक्यातील ६ साखर कारखान्यांकडे ५४ ते ५५ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे युनिट २, विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, सीताराम आणि कृषिराज शुगर या सहा साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा ३६ लाख मे.टन उसाचे गाळप होईल, अशी अपेक्षा कारखाना प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, सीताराम आणि कृषिराज शुगर कारखान्यासह तालुक्याबाहेरील काही कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप केले जाते.
तालुक्यातील ६ कारखान्यांच्या माध्यमातुन यंदाच्या गाळप हंगामात ३६ ते ३७ लाख मे.टन गाळपाची कारखाना प्रशासनाला अपेक्षा आहे; परंतु मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती याचा उसाच्या वाढीवर परिणाम झाला.
कोलमडलेले उजनीच्या पाण्याचे नियोजन यामुळे पाण्याची भासत असलेल्या कमतरतेमुळे उसाचे क्षेत्र घटलेले दिसले असते आणि गाळप निम्म्यावर आले असते; परंतु यंदा वरुणराजाने शेतकऱ्यांवर वेळेवर कृपादृष्टी दाखवल्यामुळे उसाचे उत्पन्न वाढले आहे.
अशी आहे कारखान्यांकडे उसाची नोंद
विठ्ठलराव शिंदे युनिट २
आतापर्यंतची नोंद : ७००० हेक्टर
सरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे.टन
गाळप दिवस : १३५ ते १४०
एकूण गाळप अंदाज : साडेपाच लाख मे.टन
विठ्ठल कारखाना
आतापर्यंतची नोंद : १५,२०९ हेक्टर
सरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे. टन
गाळप दिवस : १२० दिवस
एकूण गाळप अंदाज : ११ ते १२ लाख मे.टन
पांडुरंग कारखाना
आतापर्यंतची नोंद : १२,००० हेक्टर
सरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे.टन
गाळप दिवस : १२० दिवस एकूण
गाळप अंदाज : १० लाख मे.टन
सहकार शिरोमणी
आतापर्यंतची नोंद : १० हजार हेक्टर
सरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे.टन
गाळप दिवस : ११५ ते १२० दिवस
एकूण गाळप अंदाज : साडेचार लाख मे.टन
सीताराम कारखाना
आतापर्यंतची नोंद : १० हजार हेक्टर
सरासरी हेक्टरी उत्पन्न : ७५ मे.टन
गाळप दिवस : १२० दिवस
एकूण गाळप अंदाज : ५ लाख मे.टन