Join us

पंढरपूर तालुक्यात ५५ हजार हेक्टर ऊस लागवडीची नोंद कोणते कारखाने किती गाळप करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:54 AM

पंढरपूर तालुक्यातील ६ कारखान्यांच्या माध्यमातुन यंदाच्या गाळप हंगामात ३६ ते ३७ लाख मे.टन गाळपाची कारखाना प्रशासनाला अपेक्षा आहे.

करकंब : पंढरपूर तालुक्यातील ६ साखर कारखान्यांकडे ५४ ते ५५ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे युनिट २, विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, सीताराम आणि कृषिराज शुगर या सहा साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा ३६ लाख मे.टन उसाचे गाळप होईल, अशी अपेक्षा कारखाना प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, सीताराम आणि कृषिराज शुगर कारखान्यासह तालुक्याबाहेरील काही कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप केले जाते.

तालुक्यातील ६ कारखान्यांच्या माध्यमातुन यंदाच्या गाळप हंगामात ३६ ते ३७ लाख मे.टन गाळपाची कारखाना प्रशासनाला अपेक्षा आहे; परंतु मागील वर्षी दुष्काळजन्य  परिस्थिती याचा उसाच्या वाढीवर परिणाम झाला.

कोलमडलेले उजनीच्या पाण्याचे नियोजन यामुळे पाण्याची भासत असलेल्या कमतरतेमुळे उसाचे क्षेत्र घटलेले दिसले असते आणि गाळप निम्म्यावर आले असते; परंतु यंदा वरुणराजाने शेतकऱ्यांवर वेळेवर कृपादृष्टी दाखवल्यामुळे उसाचे उत्पन्न वाढले आहे.

अशी आहे कारखान्यांकडे उसाची नोंदविठ्ठलराव शिंदे युनिट २आतापर्यंतची नोंद : ७००० हेक्टरसरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे.टनगाळप दिवस : १३५ ते १४०एकूण गाळप अंदाज : साडेपाच लाख मे.टन

विठ्ठल कारखानाआतापर्यंतची नोंद : १५,२०९ हेक्टरसरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे. टनगाळप दिवस : १२० दिवसएकूण गाळप अंदाज : ११ ते १२ लाख मे.टन

पांडुरंग कारखानाआतापर्यंतची नोंद : १२,००० हेक्टरसरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे.टनगाळप दिवस : १२० दिवस एकूणगाळप अंदाज : १० लाख मे.टन

सहकार शिरोमणीआतापर्यंतची नोंद : १० हजार हेक्टरसरासरी हेक्टरी उत्पन्न : ९० मे.टनगाळप दिवस : ११५ ते १२० दिवसएकूण गाळप अंदाज : साडेचार लाख मे.टन

सीताराम कारखानाआतापर्यंतची नोंद : १० हजार हेक्टरसरासरी हेक्टरी उत्पन्न : ७५ मे.टनगाळप दिवस : १२० दिवसएकूण गाळप अंदाज : ५ लाख मे.टन

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीलागवड, मशागतदुष्काळपाऊसउजनी धरणपाणीपंढरपूर