माळशेज परिसरातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, खामुंडी, अहिनवेवाडी, सारणी शिवारात ६० टक्के कांदाकाढणी झाली असून उर्वरित ४० टक्के कांदा येत्या पंधरा दिवसात काढला जाईल.
ज्या शेतकऱ्यांचा कांदा आधीच काढणी झाला आहे. ते शेतकरी हवामान बदलाच्या भीतीने लगोलग कांदा चाळीत साठवणूक करण्याच्या कामात गुंतले आहेत.
दर आठवड्याला ढगाळ वातावरण तयार होत असल्याने अवकाळी पाऊस बरसला तर काढणी केलेल्या कांद्याचे नुकसान होऊ नये या धास्तीने कांदा लगेचच चाळीत भरावा लागत आहे.
कारण सद्या गुरुवार दि. २० मार्च रिजीव ओतूर उपबाजार येथे कांद्याला १३ ते १८ रुपये भाव मिळाला बाजारभाव उतरते असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. हे भाव भांडवली खरचं न परवडणारा असल्याने कांदा चाळीत साठवण केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या कांदा काढणी व इतर कामांमुळे शेतशिवार शेतमजुरांनी फुलून गेले आहे. पश्चिम पट्ट्याच्या आदिवासी वस्ती-पाड्यातून आदिवासी बांधव मजुरीच्या कामांसाठी ओतूर शिवारात वास्तव्याला आले आहेत.
काही मजूर वर्ग खासगी वाहनाने ये-जा करून दररोज कामानिमित्त ओतूर परिसरातील गावांमध्ये शिवारात कामाला लागले आहेत. चाळीत कांदा भरण्याची मजुरांना साधारणतः ४०० ते ८०० रुपये एवढी मजुरी मिळत आहे.
६० टक्के कांदा काढणी झाली
माळशेज शिवारात ६० टक्के कांदा काढणी झाली असून उर्वरित ४० टक्के कांदा येत्या पंधरा दिवसात काढला जाईल. कांदा साठवणूक कामात शेतकरी गुंतले आहेत.
शिवारामध्ये विविध प्रकारची कामे सुरू
अवकाळी पाऊस आला तर कांद्याचे मोठे नुकसान होऊ शकते, या भीतीने शेतकरी चिंतीत झाला आहे. म्हणून लवकरात लवकर कांदा चाळीत साठवणूक करण्याच्या कामांची धांदल शिवारामध्ये दिसून येत आहे. कांदा काढणी व साठवणूक या कामांसोबतच शिवारामध्ये विविध प्रकारची कामे सुरू आहेत. पुढे शेतकरी टोमॅटो, झेंडू, कोबी, फ्लॉवर अशा तरकारी पिकाची लागवड करतात त्यामुळे विविध ठिकाणी कांदा काढणी करून मशागतीला लागले आहेत.
शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
१४ हजार ते १५ हजार रुपयांनी एकरी कांदा काढण्यासाठी उक्ते घेत आहेत. नात्यागोत्यातील लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, पुढील पिकासाठी जमिनीची मशागत अशा धावपळीत असताना वातावरणात सतत होत असलेला बदल शेतकऱ्याची चिंता वाढवित आहे.
अधिक वाचा: साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय? वाचा सविस्तर