Lokmat Agro >शेतशिवार > १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

600 bunches of bananas to be harvested in 15 days were cut by unknown persons Loss of 5 lakhs to the farmer | १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

मिटकलवाडी (ता. माढा) येथील पुढील १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळी शस्त्राने कापून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान अज्ञात लोकांनी केले.

मिटकलवाडी (ता. माढा) येथील पुढील १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळी शस्त्राने कापून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान अज्ञात लोकांनी केले.

शेअर :

Join us
Join usNext

टेंभुर्णी: मिटकलवाडी (ता. माढा) येथील पुढील १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळी शस्त्राने कापून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान अज्ञात लोकांनी केले. ही घटना दि. १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केली.

मिटकलवाडी (ता. माढा) येथील शेतकरी संजय व दिलीप दगडू मिटकल हे दोघे बंधू शेती करतात. त्यांनी त्यांच्या शेतात जानेवारी महिन्यात अडीच एकर केळीपीक केले आहे.

ऐन उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून केळीपीक जगवले होते. यासाठी सहा लाख रुपये खर्च आला होता. पुढील पंधरा दिवसांत केळीपीक काढणीयोग्य झाले होते.

अडीच एकरांतील अंदाजे अर्ध्या एकरातील सहाशे केळी घड अज्ञात लोकांनी शस्त्राने कापून टाकले; त्यामुळे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

सध्या केळीपिकास २५ ते ३० रुपये किलो मार्केटमध्ये भाव आहे. एका केळीघडाचे ३० किलोपर्यंत वजन भरले असते. अंदाजे १८ टन मालाचे नुकसान केले आहे.

Web Title: 600 bunches of bananas to be harvested in 15 days were cut by unknown persons Loss of 5 lakhs to the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.