Join us

राज्यातील ७३ साखर कारखान्यांचे गाळप बंद! किती दिवस चालणार साखर कारखाने? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 9:55 PM

साखर उत्पादनही समाधानकारक झाले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त  फरक जाणवणार नाही. 

पुणे : राज्यभरातील उसाचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. यंदाचा गळीत हंगाम फेब्रुवारीमध्ये संपेल अशा शक्यता असताना गळीत हंगाम लांबला आहे. तर राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. त्याचबरोबर साखर उत्पादनही समाधानकारक झाले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त  फरक जाणवणार नाही. 

दरम्यान, जून ते सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झाला असला तरी नोव्हेंबर अखेरीस पडलेल्या पावसामुळे राज्यातील उस शेतीला फायदा झाला. त्यामुळे उसाचे उत्पादन वाढले आणि गळीत हंगाम लांबला आहे. तर साखरेचे उत्पादनही तुलनेने वाढले आहे. सध्या राज्यभरात १ हजार १२ लाख टन उसाचे गाळप झाले तर १ हजार २८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

राज्यातील ७३ साखर कारखान्यांचे गाळप बंदराज्यातील १८ मार्चअखेरपर्यंतच्या अहवालानुसार राज्यातील ७३ साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. हे कारखाने कमी पाण्याच्या प्रदेशातील असून पाण्याची उपलब्धता असणाऱ्या कारखान्यांचे गाळप शेवटच्या टप्प्यात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश साखर कारखाने उसाच्या उपलब्धतेमुळे गाळप थांबवतील अशी शक्यता आहे. 

राज्यात किती दिवस चालणार गळीत हंगामसध्या अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले असून मार्च अखेरपर्यंत राज्यातील बहुतांश म्हणजे ९० टक्के कारखाने आपले गाळप बंद करतील अशी शक्यता आहे. तर त्यानंतर काही कारखाने एप्रिलच्या मध्यापर्यंत चालतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

साखरेचे उत्पादन वाढलेयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असतानासुद्धा साखरेचे उत्पादन वाढले आहे. इथेनॉल निर्मितीवर बंधने घातल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊस