Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती

राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती

75 thousand hectares affected by bad weather unseasonal rain in the state; Rabi crop damaged | राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती

राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली, या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली, या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपिटीने रबी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यात गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, केळी या पिकांचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात १८ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोल्यातही १७ हजार ६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात ११ हजार ९५ हेक्टरवरील रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकसानग्रस्त जिल्हे आणि तालुके

जिल्हातालुकेबाधित क्षेत्र (हेक्टर)
नाशिकनांदगाव५४
धुळेधुळे२२०
जळगावचोपडा, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, भडगाव, धरणगाव१८,८७६
जालनाजाफ्राबाद, भोकरदन११,०९५
अकोलामूर्तिजापूर, तेल्हारा१७,०६९
अमरावतीधारणी, चिखलदरा२,२७८
बुलढाणाबुलढाणा, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा२१,७६८
वाशिमतीन तालुके३,०१४
यवतमाळ१ तालुका४५०

Web Title: 75 thousand hectares affected by bad weather unseasonal rain in the state; Rabi crop damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.