गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे.
हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, महसूल विभागाकडून अंतिम पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
९ ते ११ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्रविदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता.
त्यात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यात ३ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही १२ ते १५ दरम्यान थैमान सुरूच होते.
अवकाळीचा फटका गहू, हरभरा, ज्वारी, मका, मूग, तीळ, बाजरी तसेच कांदा, भाजीपाला व पपई, संत्रा, लिंबू, मोसंबी, केळी, पपई, कलिंगड या फळपिकांनाही बसला आहे.
सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये झाले असून येथील ५३ हजार ४०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अकोला जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये ११ हजार १५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
जिल्हानिहाय नुकसान हेक्टरमध्ये
बुलढाणा ६,५१३
अकोला १,१५७
वाशिम ३८८
अमरावती ५३,४०२
यवतमाळ २,४९४
वर्धा ३६८
भंडारा १३
गडचिरोली ११
जालना १३४
नागपूर ९०
गोंदिया ४५
चंद्रपूर ४
नंदुरबार १२२
धाराशिव ३०८
बीड १,०२१
लातूर ९५
संभाजीनगर १६३
एकूण ७९,८४८